प्रशासक न्यूज,दि.१९ऑक्टोबर२०२४
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा सध्या राज्याचे लक्ष वेधून घेत आहे राज्यातील जवळपास सर्व जागांचा तिढा सुटत आलेला असतानाच श्रीगोंद्याच्या जागेचा तिढा काही सूटताना दिसेना यावेळेस माघार नाही असे म्हणत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सौ अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंदा मतदारसंघ पिंजून काढला आहे महायुतीत ही जागा भाजपला सुटण्याचे निश्चित झाल्यावर नागवडे कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चाचपणी सुरु केली परंतु श्रीगोंद्याच्या जागेसाठी शिवसेना(ठाकरे गट)आग्रही असल्यामुळे आणि ठाकरे गटाकडून साजन पाचपुते इच्छुक असतानाच आज अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळणार असल्याची बातमी आल्यामुळे तालुक्यात आज याची जोरदार चर्चा रंगली त्यातच नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी उद्या वांगदरी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे उद्याच्या मेळाव्यातून त्यांची राजकीय दिशा ठरणार असल्यामुळे या मेळाव्याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या उमेदवारीचा त्याग करून शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानून नागवडे कुटुंबाने राहुल जगताप यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला त्यामुळे आता नागवडे कुटुंबाला संधी मिळावी अशी मागणी नागवडे यांचे कार्यकर्ते करत आहेत
सहकार क्षेत्रात नागवडे कुटुंबाच असलेलं मोठं योगदान,कोरोना काळात नागवडे कारखान्याने केलेली मदत,सौ अनुराधा नागवडे यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका,जिल्हा परिषद सदस्या या माध्यमातून केलेले काम तसेच सुसंस्कृत राजकारणी म्हणून नागवडे कुटुंबाची तालुक्यात असलेली ओळख या मुद्द्यावर नागवडे कुटुंबं निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे तिकिटासोबत अथवा तिकिटा शिवाय आरपारची लढाई लढण्याचा निर्धार सध्या नागवडे कुटुंबं व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे या निवडणुकीत चूरस निर्माण झाली आहे त्यातच महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट दोन्हीकडून अनुराधा नागवडे यांच्या नावाची आता चर्चा सुरु झाल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे
त्यामुळे आता नागवडे यांच्या उद्याच्या कार्यकर्ता मेळाव्यातून जोरदार शक्ती प्रदर्शना सोबतच पुढचा मोठा राजकीय निर्णय होणार असल्यामुळे सर्वांचे मेळाव्याकडे लक्ष लागले आहे
नागवडे फुंकणार रणशिंग,उद्या होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर १९, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: