पाचपुतेंचा विजयरथ रोखण्यासाठी आता कार्यकर्त्यांचा पुढाकार,एकास एक उमेदवारीसाठी प्रयत्न!


प्रशासक न्यूज,दि.२०ऑक्टोबर२०२४

विशाल अ चव्हाण 
श्रीगोंदा तालुक्यात महाविकास आघाडीतून वाढत चाललेली इच्छुकांची संख्या ही विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत कारण इथून मागच्या निवडणुकीचा इतिहास पाहता ज्या ज्या वेळेस पाचपुते यांच्या विरोधात जास्त उमेदवार उभे राहिले त्या त्या वेळेस मतविभागणी होऊन त्याचा फायदा पाचपुते यांनाच झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळेच आता या निवडणुकीत पाचपुते यांचा विजयरथ रोखण्यासाठी काही पाचपुते विरोधी कार्यकर्ते पुढे सरसावले असून महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आता प्रयत्न सुरु झाले आहेत 

आता सुद्धा महायुतिकडून उमेदवारीसाठी एकमेव पाचपुते कुटुंबं दावेदार असताना समोरून मात्र त्यांच्या विरोधात उमेदवारीसाठी नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातर्फे माजी आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती परंतु मागील दोन दिवसांपासून ऊ.बा.ठा गटाचे साजन पाचपुते यांनी श्रीगोंद्याच्या जागेसाठी जोरदार फिल्डिंग लावली त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक असणाऱ्या सौ.अनुराधा नागवडे यांनी सुद्धा शरद पवार गटाकडून आणि आता मशाल चिन्हासाठी जोरदार प्रयत्न केले अनुराधा नागवडे हाती मशाल घेणार अशी चर्चा कालपासून सुरु झाली त्यातच नागवडे गटाने आज दुपारी वांगदरी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे त्यात नागवडे कुटुंबं कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

मशाल चिन्ह हाती घेण्यासाठी साजन पाचपुते यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे अनुराधा नागवडे यांचे नाव महाविकास आघाडीकडून पुढे येत आहे तर दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप फिक्स उमेदवार असे जगताप यांच्या निकटवर्तीयांकडून आत्मविश्वासाने सांगितले जात आहे त्यामुळे कुठल्या पक्षाचे तिकीट मिळो अथवा ना मिळो वेळ प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा नागवडे कुटुंबाने केली आहे त्यामुळे पाचपुते यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या आजतरी मोठी आहे

*कार्यकर्त्यांची घालमेल,नेत्यांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न*

२०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाचपुते यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी पाचपुते विरोधकांची मोट बांधली होती आणि त्यात तें यशस्वी झाले होते त्यामुळे आत्तासुधा सर्व नेत्यांनी आ पाचपुते यांच्या विरोधात एकत्र येऊन एकच उमेदवार उभा करावा अशी पाचपुते विरोधी कार्यकर्त्यांची तीव्र ईच्छा आहे

*माघार घ्यायची कुणी*

पाचपुते ना रोखण्यासाठी नेत्यांनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची ईच्छा असली तरी निवडणुकीतून माघार घ्यायची कुणी अशी समस्या आता निर्माण झाली आहे २०१४साली नागवडे कुटुंबाने राहुल जगताप यांना प्रामाणिक मदत केल्यामुळे तें आमदार झाले त्यामुळे त्यांनी आता नागवडे कुटुंबाला मदत करावी असे मत नागवडे यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत पण राहुल जगताप हे शरद पवारांसोबत राहिल्यामुळे तें उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत तर साजन पाचपुते मशाल हाती घेण्यास सज्ज आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार हे सुद्धा अभी नहीं तो कभी नहीं म्हणत तिकीटासाठी प्रयत्नशील आहेत घनश्याम शेलार उमेदवार मीच असे म्हणत आहेत त्यामुळे पाचपुतेंच्या विरोधात एकास एक उमेदवार द्यावा अशी काही कार्यकर्त्यांची मागणी असली तरी निवडणुकीतून माघार नेमकी कुणी घ्यायची असा प्रश्न उभा ठाकला आहे

*उमेदवारी एकालाच, इतर नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष*

महाविकास आघाडीतील शरद पवार गट किंवा ठाकरे गटाकडून इच्छुक उमेदवारांपैकी कुठल्यातरी एकाच उमेदवाराला उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे तो उमेदवार सोडता महाविकास आघाडीतील इतर नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे उमेदवारी डावलंल्यानंतर तें ज्याला उमेदवारी भेटेल त्याच्या सोबत राहणार की बंडखोरी करणार यावर मोठी राजकीय गणिते अवलंबून आहेत




पाचपुतेंचा विजयरथ रोखण्यासाठी आता कार्यकर्त्यांचा पुढाकार,एकास एक उमेदवारीसाठी प्रयत्न! पाचपुतेंचा विजयरथ रोखण्यासाठी आता कार्यकर्त्यांचा पुढाकार,एकास एक उमेदवारीसाठी प्रयत्न! Reviewed by Prashasak on ऑक्टोबर २०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.