प्रशासक न्यूज,दि.२०ऑक्टोबर२०२४
स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी समाजकारण,राजकारणात नाव लौकीक मिळवून सर्वांना मदत करून देखील त्यांना त्यांच्या आयुष्यात संघर्ष करावा लागला आज आम्ही त्यांचा वारसा पुढे नेत असताना राजकीय मंडळी आम्हाला संघर्षच करण्यास भाग पाडत आहेत,आम्हाला तिकीट न मिळू देण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे दुःखदायी आहे सज्जन माणूस राजकारणात का चालत नाही असे सांगतानाच अनुराधा नागवडे या चांगल्याच भावुक झाल्या त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले मतदार संघात प्रतिसाद मिळत असल्याने आपण थांबणार नसून पुढील महिन्यात २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद महीला बाल कल्याण समिती माजी सभापती,जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ अनुराधा नागवडे यांनी वांगदरी येथील अंबिका माता मंदिर प्रांगणात उपस्थित हजारो समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना केली.
*स्व शिवाजीराव नागवडे हाच माझा पक्ष आणि समोर बसलेली जनता हेच माझे चिन्ह*
माझा पक्ष कोणता चिन्ह कोणते हे मला माहिती नाही पण स्व बापू हेच माझा पक्ष आणि समोर उपस्थित जनता हेच आपले चिन्ह असे सांगत मी निवडून येणारच हा विश्वास व्यक्त करत मी आमदार झाल्यावर सामान्य जनता आमदार होणार असा विश्वास त्यांनी सर्वांना दिला तसेच तालुक्यातील काही लोक नागवडे कुटुंबाला संपवायला निघालेत पण जनता त्यांना पुरून उरेल असे देखील अनुराधा नागवडे यांनी सांगितले
अध्यक्ष स्थानी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस होते
सौ. अनुराधा नागवडे म्हणाल्या यापूर्वी आम्ही अनेकांना मदत केली राज्य पातळीवर नेत्यांना मदत केली माझ्या उमेदवारीसाठी पती राजेंद्र नागवडे,तसेच बाबासाहेब भोस,दिर दीपक नागवडे,आदेश नागवडे हे सर्व नेते गेले महिनाभर पक्ष श्रेष्ठींना भेटत आहेत आज आम्हाला अनुकूल वातावरण असताना अडचणी येत आहेत अस म्हणत भाऊक होत सौ.नागवडे यांनी संघर्ष करावाच लागत असेल तर आम्ही तयार असून सामान्य मतदारांच्या उत्कर्षासाठी संघर्ष करू उभे राहू निवडून येऊ उपस्थित कार्यकर्त्यांनी मदत करावी असे आवाहन केले.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी बोलताना अजित पवार यांनी आपल्याला उमेदवारीचा खात्रीशीर शब्द दिला होता पण निवडणूक काही दिवसावर आल्यामुळे मी आज अजित दादांना भेटून वेगळा निर्णय घेत असल्याचे सांगितले त्यांची परवानगी घेऊनच आपण राष्ट्रवादी च्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले
काहीही झाले तरी निवडणूक लढविण्याचा निर्धार असून समर्थक आणि जनता महाविकास आघाडीला अनुकूल असल्याने प्रयत्न सुरू आहेत दोन दिवसात पक्षीय पातळीवर निर्णय होईल असा आशावाद व्यक्त करत दोन तीन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे राजेंद्र नागवडे यांनी स्पष्ट केले
अनुराधा नागवडे यांना अपक्ष लढण्याची वेळ येऊ देणार नाही महाविकास आघाडीचे तिकीट आणण्याची जबाबदारी माझी असे बाबासाहेब भोस यांनी ठामपणे सांगितले तसेच महाविकास आघाडीचा उमेदवारीचा निर्णय अद्याप झाला नसून दोन दिवसात आपल्या मनासारखा निर्णय होईल असे त्यांनी सांगितले
*सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न*
अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवून देतानाच सर्वांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे वेगळी चूल मांडून उपयोग होणार नाही असे सूचक वक्तव्य भोस यांनी केल्यामुळे २०१४ ची पुनरावृत्ती होणार का आणि पाचपुते यांच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
यावेळी माऊली हिरवे,संजय डाके,बंडू पंधरकर, सतीश मखरे,प्रशांत गोरे,राकेश पाचपुते यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली
प्रास्तविक,सूत्रसंचालन कारखाना संचालक सुभाष शिंदे यांनी केले.
श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील समर्थक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भरसभेत अनुराधा नागवडे यांना अश्रू अनावर!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २०, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: