नागरिकांच्या लढ्यापुढे प्रशासन झुकले!


प्रशासक न्यूज,दि.२१ऑक्टोबर२०२४

श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथील दौंड अहिल्यानगर महामार्गवरील पोलीस बंदोबस्त घेऊन सुरु केलेला टोलनाका स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत आज पुन्हा बंद केला नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासना ला देखील आज नमती भूमिका घ्यावी लागली २० किलोमीटर परिसरातील स्थानिक नागरिकांना या टोल नाक्यावर जोपर्यत सूट मिळत नाही आणि त्यावर वरिष्ठ पातळीवर खात्रीशीर निर्णय होत नाही तोपर्यत पुढील एक महिन्यासाठी हा टोल पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेते आणि स्थानिक आंदोलक नागरिकांनी घेतला यावेळी काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेश पाचपुते व काष्टी व्यापारी असोशीयेशनचे अध्यक्ष संजय काळे यांनी नागरिकांच्या वतीने परखड भूमिका मांडताना टोल मधून सूट द्या किंवा स्थानिक नागरिकांसाठी एक स्वतंत्र लेन बनवून त्यातून त्यांना सोडा अशी मागणी केली तसेच गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली 

 स्थानिकांना टोल मधून सूट मिळावी या मागणीसाठी आज जवळपास चार तास निमगाव खलू येथील टोल नाक्यावर काष्टी,आर्वी,निमगाव खलू, सांगवी,वांगदरी यासह आसपासच्या गावातील नागरिकांनी कडक उन्हात बसून धरणे आंदोलन केले या आंदोलनाला युवा नेते विक्रमसिंह पाचपुते,अनुराधा नागवडे,डॉ प्रणोतीमाई जगताप,घनश्याम शेलार असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते कडक उन्हाच्या तडाख्यात हे सर्व नेते आंदोलकांसह बसून होते या नेत्यांसह बंडू तात्या जगताप,डॉ अनिल कोकाटे,आप चे राजेंद्र नागवडे,योगेश भोईटे,टिळक भोस,मेजर चांगदेव पाचपुते,महेश दरेकर, सचिन पाचपुते यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय धरणे आंदोलन मागे घेणार नाही अशी आग्रही भूमिका नागरिकांनी घेतली नागरिकांच्या आक्रमकपणामुळे अहिल्यानगर येथून टोल चे वरिष्ठ अधिकारी आले तसेच श्रीगोंदा तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे या देखील आंदोलनस्थळी आल्या त्यानंतर तहसीलदार डॉ वाघमारे यांनी लोकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन टोल मधून नागरिकांना सूट मिळावी किंवा मासिक पासची किंमत कमी करावी अशी विनंती टोल प्रशासनाकडे केली परंतु त्याला टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय आपण घेऊ शकत नाही असे म्हणत टोलमधून सुट देण्यास असमर्थता दर्शवली

*विक्रम पाचपुते यांची आक्रमक भूमिका*
हा शासकीय टोल आहे त्यामुळे टोल मधून सूट देता येणार नाही असे टोल च्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर युवा नेते विक्रम पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेत टोल बंद करण्याचा अधिकार तुम्हांला नाही मग मागच्या वेळेस वीस दिवस टोल बंद राहिला तेव्हा तुम्ही काय केले मागच्या वेळेस आंदोलकानी टोल बंद केला त्यावेळी तुम्ही तो टोल कसा सुरु केला टोल सुरु करताना आंदोलकांशी चर्चा कां केली नाही ही तुमची चूक आहे आणि चुकीला माफी नाही असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगत पुढील निर्णय होत नाही तोपर्यत टोल बंद ठेवा नाहीतर आम्ही इथेच बसून राहू आमच्यावर काय गुन्हे दाखल व्हायचे ते होऊ द्या अशी आक्रमक भूमिका घेत विक्रम पाचपुते यांनी टोल बंद करां असे सांगितले त्याला सर्वांनीच प्रतिसाद देत सर्वानुमते टोल पुढील एक महिन्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

 आंदोलनानंतर टोल नाक्यावरील सर्व्हर तात्काळ बंद करण्यात आले त्यामुळे आज नागरिकांच्या आक्रमक पवित्र्या पुढे प्रशासनाला नमती भूमिका घ्यावी लागली आणि नागरिकांच्या लढ्याला तात्पुरत्या स्वरूपात कां होईना यश आले कायदा सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता धरणे आंदोलन सुरु असूनसुद्धा एका बाजूने वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती
नागरिकांच्या लढ्यापुढे प्रशासन झुकले! नागरिकांच्या लढ्यापुढे प्रशासन झुकले! Reviewed by Prashasak on ऑक्टोबर २१, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.