प्रशासक न्यूज,दि.२२ऑक्टोबर २०२४
विशाल अ चव्हाण
संपूर्ण राज्यात दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्यासाठी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ क्रमांक २२६ मध्ये प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली आहे आज दि.२२ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होणार असून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत दि.२९ऑक्टोबर२०२४ ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून दि.३०ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया होणार आहे तर दि.४ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील शासकीय धान्य गोदाम क्रमांक.३मध्ये दि.२३ नोव्हेंबर ला मतमोजणी होणार आहे
या मतदार संघातील एकूण ३४५मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मागील पाच वर्षात श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार--१३,२२५,महिला मतदार--१४,२११ असे एकूण २७,४३५ मतदारांची वाढ झाली आहे तर इतर मतदारांची संख्या ही एक ने कमी होऊन ती दोन एवढी झाली आहे मागील पाच वर्षात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांमध्ये झालेली वाढ लक्षणीय म्हणावी लागेल
तर यावर्षी होत असलेल्या २०२४विधानसभा निवडणुकीसाठी ७,८८१ नवमतदार पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत
या निवडणुकीत श्रीगोंदा मतदार संघात विधानसभेसाठी पुरुष मतदार--१,७५,४६७
महिला मतदार--१,६१,९२६ आणि इतर--२ असे एकूण ३,३७,३९५ एवढी मतदारांची संख्या आहे
अहिल्यानगर येथील भूसंपादन क्रमांक १५उपजिल्हाधिकारी श्रीमती गौरी सावंत या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत श्रीगोंदा तहसील कार्यालय तहसीलदारांचे दालनात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत
या निवडणुकीत उमेदवारांना ४०लाख रुपये इतकी निवडणूक खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी १०हजार तर अनुसूचित जाती,जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ हजार एवढी अनामत रक्कम भरावी लागणार आहे
३४५मतदान केंद्रावर ५कर्मचारी व १पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे
नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र सुरु करण्यात आले असून त्यासाठी १९५०हा टोल फ्री क्रमांक असणार आहे
श्रीगोंदा मतदारसंघात राखीवसह ४१४ बी.यु, ४१४ सी.यु आणि ४४४ व्हीव्हीपॅट आवश्यक असून प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली असून सरमिसळ झाल्यावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्राप्त होणार आहेत
आपण ज्या उमेदवारला मत दिले ते त्याच उमेदवाराला मतदान गेल्याची खात्री होण्यासाठी ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट मशीन सोबत जोडले जाणार आहेत
*मतदान केंद्रावर पुरवल्या जाणाऱ्या सुविधा*
मतदार सुविधा कक्ष,मतदारांना आरोग्यविषयक सुविधा, लहान बाळासाठी पाळणाघार, पिण्याचे पाणी, स्वछतागृह,रॅम्प, लाईट या सुविधा मतदान केंद्रावर पुरवल्या जाणार आहेत
श्रीगोंदा मतदार संघात एकूण मतदान केंद्राच्या ५०% म्हणजेच १७२ मतदान केंद्रानवर वेबकास्टिंग केले जाणार आहे
*या मतदारांना घरी बसून मतदान करता येणार*
मतदान केंद्रावर जाणे अशक्य असणाऱ्या ८५वर्ष्यापेक्षा जास्त वयस्कर व्यक्ती,४०टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असणारे दिव्यांग मतदार,कोव्हीड बाधित मतदार यांना घरी बसून मतदान करता येणार आहे हे बंधनकारक नसून एक अतिरिक्त सुविधा आहे तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेची सोय करण्यात आली आहे
*मतदान केंद्राबाबत माहिती*
पडदानशीन मतदान केंद्र संख्या--४, आदर्श मतदान केंद्र संख्या--३,पूर्णपणे महिला संचलित केंद्र--१,दिव्यांग मतदान केंद्र--१, युवा कर्मचारी संचलित केंद्र--१, निगेटिव्ह मतदान केंद्र--निरंक
या निवडणुकीसाठी ३७क्षेत्रीय व ३ राखीव असे एकूण ४० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे
*निवडणूक आयोगाचा माहिती तंत्रज्ञानावर भर देत मतदार आणि उमेदवार यांच्यासाठी ऍप्स*
ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करणे, आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार करणे,सभा,हेलिपॅड,प्रचाराशी संबंधीत विविध परवाने ऑनलाईन मिळण्यासाठी,पैसे,दारू यासह मतदारांना होणारे वाटप जप्त करणे,उमेदवाराची पार्श्वभूमी जाणून घेणे अशी वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने माहिती तंत्रज्ञानावर भर देत उमेदवार व मतदार यांच्यासाठी वेगवेगळे मोबाईल ऍप्स बनवले आहेत
निवडणुकीची तयारी पूर्ण, प्रशासन सज्ज!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २१, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: