विशाल अ चव्हाण
प्रशासक न्यूज,दि.२९जुलै२०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार)गटाच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदाचा तिढा अखेर सुटला असून तालुकाध्यक्ष पदी आता राजेंद्र नागवडे यांचे विश्वासू नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिली
शिंदे यांना निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,अ नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा हे उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यपदी या आधी शरद नवले यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर राजेंद्र नागवडे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे विश्वासू सुभाष शिंदे यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती परंतु शरद नवले हे देखील तालुकाध्यक्षपदी कार्यरत होते त्यामुळे एकाच पक्षाला श्रीगोंदा तालुक्याला दोन तालुकाध्यक्ष लाभले होते यातील नेमके अधिकृत तालुकाध्यक्ष कोण असा प्रश्न कार्यकर्त्याना पडला होता परंतु आतां सुभाष शिंदे यांची निवड झाल्यामुळे तालुकाध्यक्ष पदाचा तिढा आता संपूष्टात आला आहे
*शरद नवले यांना पदावरून हटवले असून शिंदे यांची नियुक्ती*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या तालुकाअध्यक्ष पदावरून शरद नवले यांना हटवून त्यांच्या जागी सुभाष शिंदे यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिली

श्रीगोंद्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला!
Reviewed by Prashasak
on
जुलै २९, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै २९, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: