विशाल अ चव्हाण
प्रशासक न्यूज,दि.२९जुलै२०२४आतापर्यत मी तालुक्यातील प्रत्येक नेत्याला सर्वतोपरी मदत केली आ बबनराव पाचपुते,माजी आमदार राहुल जगताप या दोघांना आमदार होण्यासाठी विधानसभा निवडणुकीत मदत केली २०१९साली विधानसभेचे उमेदवार घनश्याम शेलार यांना मदत केली स्व शिवाजीराव नागवडे यांना कारखान्याच्या निवडनुकीत तर त्यांच्या सुनबाई अनुराधा नागवडे यांच्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना सुद्धा थांबलो आणि त्यांना जिल्हा परिषदेचे सदस्य केले त्यामुळे आता या सर्व नेत्यांनी मला आमदार करण्यासाठी मदत करण्याची त्यांची जबाबदारी आहे तसेच साजन पाचपुते,बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे हे माझे मित्र असून त्यांनी मला विधानसभेला मदत केल्यास त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मी प्रयत्न करेल असा आत्मविश्वास व्यक्त करत यंदाची विधानसभा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत सर्व ताकतीनिशी लढवणारच अशी भीष्म प्रतिज्ञा करत विजयी झालो तर पुढील विधानसभा निवडणुकीला दुसऱ्यांना संधी देणार पराजीत झालो तरी आता यापुढ आयुष्यात परत कोणतीच निवडणूक आपण लढणार नाही ही आपली शेवटची निवडणूक असे सांगत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले
आज श्रीगोंद्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली
या पत्रकार परिषदेसाठी बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार,सुभाष काळाने, बाळासाहेब ढवळे, सुखदेव लाढाणे, सोपान हिरवे, एकनाथ पवार, सलीम शेख, यांच्यासह बेलवंडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
*निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली, कसलीच तडजोड होणार नाही*
भविष्यात आपण तडजोडीतला उमेदवार असल्याचा अपप्रचार होऊ शकतो मात्र २००९ साली आ पाचपुते यांच्या विरोधात बंड करून आपण अपक्ष उमेदवारी केली होती त्यावेळी कुठल्याही प्रलोभनाला मी बळी पडलो नाही आता सुद्धा मी निवडणूक लढवण्यावर ठाम असून सर्व तयारी पूर्ण झाल्याचे शेलार यांनी सांगितले
*माझ्याकडे आमदारकीसाठी पूर्णवेळ*
राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेते अनेक महिन्यांपासून माझ्या संपर्कात आहेत माझ्या उमेदवारी विषयी ते सकारात्मक आहेत मी सध्या कुठल्याही पक्षात नाही कोणत्या पक्षातून उमेदवारी करायची याची मी चाचपणी करत आहे तसेच आपल्या कुठल्याही शैक्षणिक संस्था किंवा सहकारी संस्था नाहीत त्यामुळे आमदारकीला मी पूर्णवेळ देऊ शकतो असे सांगत त्यांनी इतर नेत्यांना टोला लगावला
नेत्यांनी आता परतफेड करावी,माघार नाही,निर्धार पक्का!या नेत्याची भीष्मप्रतिज्ञा
Reviewed by Prashasak
on
जुलै २९, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: