प्रशासक न्यूज, दि.३१जुलै२०२४
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट 2024 वाऱ गुरुवार रोजी भव्य जयंती उत्सव समिती ससाणेनगर सिद्धार्थनगरच्या वतीने उत्सव साजरा होत आहे..या जयंतीच्या कार्यक्रमाचे स्वरूप बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी 11.45 वाजता अभिवादन व फटाके आतिषबाजी होणार आहे.तसेच गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या हस्ते अभिवादन व ध्वजारोहण होणार आहे. 10 वाजता श्रीगोंदा शहरात उत्कृष्ट मनमोहक झांजपथक लेझिमपथक सह मिरवणूक निघणार आहे.दुपारी 1 वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहेसायंकाळी 4 वाजता फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष अँड संभाजी आप्पा बोरुडे यांचे व्याख्यान होणार आहे..शालेय मुलांना वह्या पुस्तके वाटप कार्यक्रम करून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे..तसेच सायंकाळी लेझर शो चे आयोजन करण्यात आले आहे.स्मारकात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
शुक्रवार दिनांक 02 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ गायत्री शेलार फेम पिचली माझी बांगडी,आझाद केलं तुला,डॉ अण्णाभाऊ साठे व लहुजी समाजप्रबोधनपर गीतांचा स्वरगंध कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती ससाणेनगर सिद्धार्थनगर अध्यक्ष मा.नगरसेवक अनिल ससाणे,उपाध्यक्ष शिवाआप्पा घोडके,सचिव संदीपभाऊ उमाप,नितीन ससाणे, सल्लागार किशोर दादा नेटके,खजिनदार लाला ससाणे,,राजू ससाणे,गणेश ससाणे, प्रा.संदिप सर,सचिन पाटोळे,कुणाल शिरवाळे, तृषाल ससाणे,गोरख घोडके यांनी केले आहे.
तरी श्रीगोंदा तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
भरगच्च कार्यक्रमांनी उद्या साजरी होणार लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांची जयंती!
Reviewed by Prashasak
on
जुलै ३१, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै ३१, २०२४
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: