श्रीगोंदा बाजारसमिती भ्रष्टाचाराचे कुरणक्षेत्र/- सभापतींची घणाघाती टीका


प्रशासक न्यूज,दि.१५एप्रिल

श्रीगोंदा कृषीउत्पन्न बाजारसमिती ही भ्रष्टाचाराचे कुरण क्षेत्र बनली असून संस्थेतील इथून मागच्या काळात झालेला भ्रष्टाचार पाहता इथं कुणी या आणि पोटभर चरून जा अशी अवस्था या संस्थेची झाली असल्याची घणाघाती टीका बाजारसमितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली तसेच मी बाजारसमितीचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणल्यामुळे विरोधक माझी बदनामी करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले
लोखंडे यांनी यावेळी मागील १५ वर्ष्याच्या कार्यकाळात बाजारसमितीमध्ये किती भ्रष्टाचार झाला याची आकडेवारी जाहीर केली
तसेच या सर्व प्रकारबाबत मागील १५ वर्ष्याचे लेखा परीक्षण आपण लावणार आहोत असे त्यांनी सांगितले
तसेच आतापर्यत विविध मार्गातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असूनसुद्धा दोषींवर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला

*इतिहासात आतापर्यतचे सर्वात जास्त उत्पन्न*

आपल्या कार्यकाळात बाजारासमितीला एका वर्ष्यात एकूण २कोटी ५लाख रुपये एवढं विक्रमी उत्पन्न भेटले असून त्यातील खर्च वजा जाता ८६लाख ५६ हजार रुपये एवढा वाढवा नफा झालेला असून ते पैसे बाजारसमितीच्या खात्यावर आज जमा आहेत असे सांगतानाच श्रीगोंदा बाजारसमितीच्या स्थानपनेपासून ते आजपर्यत च्या इतिहासतील हे बाजारसमितीला मिळालेले सर्वात जास्त उत्पन्न असल्याचे अतुल लोखंडे यांनी सांगितले मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळेस खर्च कमी होऊन ३९ टक्क्यानी उत्पन्न वाढल्याचे त्यांनी सांगितले

*नेत्यांनी स्वतःच्या सोईच्या कारभारासाठी सह्यांचे अधिकार काढले*

नेत्यांनी स्वतःच्या सोईच्या कारभारासाठी कायद्यात कुठलीही तरतूद नसताना धनसिंग भोईटे बाजारासमितीचे सभापती असताना त्यांचे सह्यांचे अधिकार काढून त्यावेळचे उपसभापती वैभव पाचपुते यांना ते दिले होते त्यावेळी तीन वर्ष्याच्या कार्यकाळात १३लाख ४३हजार रुपयांचा तोटा बाजारसमितीला झाला असे सांगतानाचा नागवडे,पाचपुते या दिग्गज नेत्यांच्या दुर्लक्षामुळे बाजारसमितीत भ्रष्टाचार बोकाळल्याची टीका लोखंडे यांनी यावेळी केली

*तत्कालीन सभापतींच्या काळात पावणेतीन कोटींचा गफला*

२०१३/१४ च्या लेखा परीक्षण अहवालात तत्कालीन सभापतीच्या नावे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत सभापतीनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत बेरर चेक द्वारे पावणे तीन कोटी रुपयांची रक्कम काढली परंतु त्याचा कुठलाही लेखाजोखा सापडत नाही असा आरोप लोखंडे यांनी केला त्यावेळी बाळासाहेब नाहाटा हे सभापती होते एवढा मोठा घोटाळा होऊनसुद्धा कोणतेही कारवाई करण्यात आली नाही यावर लोखंडे यांनी आश्चर्य व्यक्त केले

*सचिवाच्या कारभारावर ताशेरे,गुन्हा दाखल न केल्यास उपोषणाचा ईशारा*
बाजारसमितीच्या सचिवाने वेगवेगळ्या माध्यमातून बाजारसमितीत करोडे रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे सांगत ४०लाख रुपये बांधकाम दुरुस्ती तरतूद खर्च दाखवण्यात आला आहे परंतु प्रत्यक्षात कुठलेच कसलेच बांधकाम करण्यात आलेले नाही त्यामुळे हे पैसे कुठं गेले असाही सवाल लोखंडे यांनी उपस्थित केला आहे त्या सचिवामुळे आणि तत्कालीन सभापती यांच्यामुळेच बाजारसमितीचा विकास झाला नसल्याची टीका अतुल लोखंडे यांनी केली तसेच बोगस कांदा अनुदान प्रकरणात पोलीस निरीक्षक दबावाखाली असून ते गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत जर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर पोलीसांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा ईशारा त्यांनी दिला आहे
या पत्रकार परिषदेसाठी संदीप रोडे,योगेश मगर उपस्थित होते


श्रीगोंदा बाजारसमिती भ्रष्टाचाराचे कुरणक्षेत्र/- सभापतींची घणाघाती टीका श्रीगोंदा बाजारसमिती भ्रष्टाचाराचे कुरणक्षेत्र/- सभापतींची घणाघाती टीका Reviewed by Prashasak on एप्रिल १५, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.