येत्या १९तारखेला श्रीगोंद्यात रस्तारोको


प्रशासक न्यूज,दि.१३नोव्हेंबर 

श्रीगोंदा तालुक्यातील दूध उत्पादकांच्या वतीने येत्या १९ नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी दहा वाजता श्रीगोंदा-दौंड रस्त्यावर महात्मा फुले सर्कल येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आज श्रीगोंदा दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले
निवेदन देताना सोनू कोथिंबीरे,अरविंद कापसे,सारंग होले,ऋषिकेश गायकवाड,संदीप कोथिंबीरे,नानासाहेब शिंदे,विजय वाघमारे,सागर रसाळ,प्रवीण काळे निखिल कोथींबीरे,दादा होले,समीर कोथींबीरे आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शासनाने दुधाला ३४ रु हमीभाव जाहीर करून देखील सुद्धा श्रीगोंद्यातील खाजगी आणि सहकारी प्लॅन्ट चालकांनी संगनमताने दुधाचे भाव पाडून आज ते २६रु ते २८ रु प्रति लिटर एवढा कमी बाजारभाव दुधाला देत आहेत.उत्पादन खर्चापेक्षा देखील मिळणारा कमी दर मिळत असल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील दूध उत्पादक प्रचंड अडचणीत आला आहे.एकीकडे पशुखाद्याचे वाढलेले दर, दुष्काळ,चारा टंचाई,तसेच भेसळयुक्त दुधामुळे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या शेतकर्यांवर होणारा अन्याय या सर्व गोष्टींवर आवाज उठवण्यासाठी आणि सरकारने दूध उत्पादकांच्या केलेल्या फसवणुकीचा निषेध म्हणून येत्या रविवारी हे रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे

तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दूध उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष सोनू कोथींबीरे यांनी केले आहे.
येत्या १९तारखेला श्रीगोंद्यात रस्तारोको येत्या १९तारखेला श्रीगोंद्यात रस्तारोको Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १३, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.