प्रशासक न्यूज,दि.३सप्टेंबर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ तरुणाने बाईक पेटवून देत सरकारचा निषेध केला आहे. हिंगोलीतल्या जवळा बाजार येथे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी परिसरातील वातावरण तापलं आहे. गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी स्वत:ची कार जाळून पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध केला होता. त्यानंतर आता ठिकठिकणी आंदोलन होताना दिसत आहे. अशातच संपूर्ण महाराष्ट्रात लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहेत.जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकावर झालेल्या हल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. हिंगोली जिल्ह्यात जवळाबाजार येथे भर चौकात मराठा तरुण वसमत तालुक्यातील नहाद येथील विनायक बोरगड यांनी स्वतःची दुचाकी जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर शेकडो तरुण रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत केलं. मात्र दुचाकी मात्र जळून खाक झाली.
काल कार आणि आज नवीकोरी दुचाकी,अश्याप्रकारे निषेध
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०३, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०३, २०२३
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: