हिरडगाव येथे उद्या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ:,माजी मंत्री बाळासाहेब थोरात करणार मार्गदर्शन
प्रशासक न्यूज,दि.३सप्टेंबर
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे उद्या दि.४सप्टेंबर सोमवारी सायंकाळी पाच वाजता तुकाई मंदिर परिसर येथे काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी दिली या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे तसेच काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांच्यासह श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तसेच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनीदेखील या जनसंवाद यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन राजेंद्र नागवडे मित्र मंडळाच्या वतीने व श्रीगोंदा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहेमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार दि.३सप्टेंबर ते दि.१३सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे काँग्रेस पक्षाचा विचार सामान्य लोकांपर्यत पोहोचावा तसेच राहुल गांधींनी ज्या पद्धतीने जनतेत जाऊन भारत जोडो यात्रा काढत काँग्रेस पक्षाला एक नवी दिशा आणि बळकटी देण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाकडून राज्यात अश्याप्रकारे जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे
हिरडगाव येथे उद्या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ:,माजी मंत्री बाळासाहेब थोरात करणार मार्गदर्शन
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०३, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०३, २०२३
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: