श्रीगोंदा शहरातील 'त्या' मंडळाच्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतुक!


प्रशासक न्यूज,दि.२८सप्टेंबर

गणेश विसर्जन म्हंटल कि,डीजे चा दणदणाट त्यावर थिरकणारी तरुणाई असं चित्र उभ राहत अलीकडे या डीजेच्या आवाजाने अनेक तरुण पोरांना आपला जीव गमवावं लागला आहे तरीसुद्धा डीजेचा वापर काही कमी होताना दिसत नाही डीजे समोर नाचणाऱ्या तरुण पोरांसोबतच त्या भागात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य या डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे धोक्यात आले आहे तरीसुद्धा त्याकडे कुणी गंभीर्याने पाहताना दिसत नाही

गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे न वापरता ढोली बाजा,बँड,पारंपारिक वाद्य वाजवन्यावर प्रशासनाकडून भर दिला जातो पोलीस प्रशासनसुद्धा डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळण्याबाबत मंडळाना सूचना करते परंतु प्रत्यक्षात मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही

डीजे विरहित विसर्जन मिरवणूका हव्यात यावर चर्चा सर्वच स्तरातून होतात परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही

परंतु श्रीगोंदा शहरातील साळवणदेवी मित्र मंडळ हे या गोष्टीला अपवाद ठरले असून त्यांनी आज गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजेला फाटा देत त्याऐवजी कीर्तनाचे आयोजन करून सर्वच मंडळासमोर एक आदर्श उभा केला आहे या मंडळाने आज संध्याकाळी सर्वांसाठी महाप्रसाद व त्यानंतर ह भ प माऊली महाराज रासकर यांचे कीर्तन आयोजित केले आहे कीर्तन झाल्यावर अतिशय साधेपणाने पारंपारिक पद्धतीने गणरायाला निरोप देण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर मंडळानी सुद्धा त्यांचे अनुकरण करने गरजेचे असल्याचे मत लोकांमधून व्यक्त होत आहे

*डीजेच्या आवजावर मर्यादा हवीच* लग्नसमारंभ,महापुरुषांच्या जयंती,वाढदिवस,सण-उत्सव,अश्या विविध कार्यक्रमामध्ये हल्ली डीजेचा सर्रास वापर होतो डीजेच्या तालावर थिरकत तरुणाई आनंद साजरा करते परंतु डीजेच्या आवाजाने इतरांना किती त्रास होतो याचा मात्र त्यांना विसर पडतो म्हणून अश्या कार्यक्रमात डीजेच्या आवाजावर बंधन असणे अतिशय गरजेचे आहे
श्रीगोंदा शहरातील 'त्या' मंडळाच्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतुक! श्रीगोंदा शहरातील 'त्या' मंडळाच्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतुक! Reviewed by Prashasak on सप्टेंबर २७, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.