खून करून चेहरा जाळला,श्रीगोंदा तालुक्यातील घटना


प्रशासक न्यूज,दि.२६सप्टेंबर

श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ शिवारातील रेल्वेगेट मोरीजवळ महादेववाडीला जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाजवळ एका खड्ड्यात काल दि.२५सप्टेंबर रोजी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास एका ३५ ते ४०वर्ष्याच्या अज्ञात व्यक्तीचा चेहेरा जळलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आला पोलिसांना याबाबत माहिती समजल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता या व्यक्तीचा दोरीने गळा आवळून खून करून नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी व मयत व्यक्तीची ओळख न पटण्यासाठी त्याचा चेहेरा जाळून टाकल्याचे निष्पन्न झाले

चेहेरा जळलेला असल्यामुळे मयत खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यासोबतच अज्ञात आरोपीचा शोध घेणे हे देखील श्रीगोंदा पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे

सदर घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे करत आहेत

सदर व्यक्ती कोण आहे त्याचा खून कुणी आणि का केला हे आता पोलीस तपासानंतरच निष्पन्न होणार आहे

खून करून चेहरा जाळला,श्रीगोंदा तालुक्यातील घटना खून करून चेहरा जाळला,श्रीगोंदा तालुक्यातील घटना Reviewed by Prashasak on सप्टेंबर २५, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.