नियमबाह्य व्याज आकारणी केल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता


प्रशासक न्यूज,दि.१३सप्टेंबर

श्रीगोंदा शहरातील प्रफुल्ल रामदास दळवी यांनी १/०७/२०१० रोजी इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेकडून वाहन खरेदीसाठी ९,७४,५००रुपये एवढे कर्ज घेतले होते त्यानंतर दळवी यांनी सुरुवातीला या कर्जपोटी पतसंस्थेमध्ये काही हप्ते भरले त्यानंतर सदर पतसंस्थेने दळवी यांच्या कर्जाच्या ठरलेल्या व्याजदरात सहकार कायद्याच्या नियमाविरुद्ध व सहायक निबंधक यांच्या आदेशाशिवाय कर्जदार दळवी यांच्या परस्पर वाढ केली त्यानंतर दळवी यांनी पुढील हप्ते भरले नाहीत त्यातून दळवी यांच्याकडे कर्जाची थकीत रक्कम झाली त्यामुळे या थकीत कर्जाचे वसुलीपोटी इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेने दि.०७/११/२०१७रोजी ११,०४,३४७ एवढ्या रकमेचा धनादेश दळवी यांच्या खात्यात भरला परंतु तो धनादेश न वटल्यामुळे सदर पतसंस्थेने दळवी यांच्याविरोधात श्रीगोंदा फौजदारी न्यायालयात निगोशीयेबल इन्स्ट्युमेंट ऍक्ट कलम १३८प्रमाणे फौजदारी केस दाखल केली होती 

सदर केसमध्ये फिर्यादी पतसंस्थेने आरोपीचा कर्ज खाते उतारा पुराव्याकामी दाखल केला परंतु सदर कर्जखाते उताऱ्यामध्ये फिर्यादी पतसंस्थेने आरोपीला कर्ज मंजूर करताना ठरवून दिलेल्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजाची आकारणी केली तसेच कर्ज खात्यामध्ये फिर्यादी पतसंस्थेने वेळोवेळी बिगर तपशीलाचा खर्च आरोपीचे नावे टाकला व व्याजाची आकारणी केली त्यामुळे आरोपी हा फिर्यादी पतसंस्थेस धनादेशावरील नमूद रक्कम रु ११,०४,३४७ कायदेशीर देणे लागत होता हे फिर्यादी पतसंस्थेस सिद्ध करता आले नाहीं त्यामुळे मा. अतिरिक्त फौजदारी न्यायालय प्रथम वर्ग श्री एन एस काकडे यांनी दळवी यांची सदर केसमधून निर्दोष मुक्तता केली आहे

या केसमध्ये दळवी यांच्यावतीने ऍड स्वानंद पी. राऊत रा श्रीगोंदा व त्यांचे सहकारी ऍड विनायक भुते,ऍड दामू वडवकर व ऍड अमित वाळुंज यांनी कामकाज पहिले

नियमबाह्य व्याज आकारणी केल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता नियमबाह्य व्याज आकारणी केल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता Reviewed by Prashasak on सप्टेंबर १२, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.