डीजे नकोच,पारंपारिक वाद्यांचा वापर करा/-पो अधीक्षकांच्या सूचना


प्रशासक न्यूज,दि.१४सप्टेंबर

डीजे च्या आवाजामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे येत्या गणेश उत्सवात डीजे न लावता पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याच्या सूचना अ नगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीगोंदा तालुक्यातील गणेशमंडळाना दिली तसेच कर्णकरकश्य आवजात वाजणाऱ्या डीजे वाल्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे देखील ओला यांनी यावेळी सांगितले

गणेशोत्सव व ईद ये मिलाद या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरासह श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी व श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमधील गणेश मंडळाची तसेच शांतता कमिटीची बैठक आज शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मार्गदर्शन करताना ओला बोलत होते

यावेळी त्यांनी गणेशमंडळाना मार्गदर्शन करण्यासाठी छापलेल्या पुस्तकाबद्दल माहिती दिली तसेच कुणाला कधीही कुठली अडचण आल्यास मदतीसाठी आपल्याला व आपल्या पोलिसांना थेट संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली तसेच शहरातील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे देखील पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले

तसेच गणेशमंडळानी योग्य त्या परवानगी घेऊन गणपतीची स्थापना करावी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाहीं याबाबत सर्वानी सहकार्य करावे असे देखील आवाहन त्यांनी केले तसेच शहरातील पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय परिसरात एका विशिष्ट समाजाच्या लोकांचा दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास असतो त्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी राजकीय नेत्यांनी केली होती त्याबाबत देखील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ओला यांनी दिले

यावेळी नगरसेवक प्रशांत गोरे,आजीम जकाते, शिवसेना तालुकाप्रमुख(शिंदेगट)नंदकुमार ताडे, नगरसेवक मनोहर पोटे,प्रा बाळासाहेब बळे,उत्तम डाके यांनी विविध सूचना मांडल्या तसेच जेष्ठ नेते बाबासाहेब भोस,बीआरएस चे नेते घनश्याम शेलार,काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे,आमदार बबनराव पाचपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना येणारे सर्व सण श्रीगोंदेकर एकोप्याने आणि शांततेत साजरे करतील अशी ग्वाही पोलीस अधीक्षकांना दिली

पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी कार्यक्रमाचे सुरुवातीला चालुवर्षी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाच्या असलेल्या सूचनांबाबत गणेश मंडळानं माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दत्ताजी जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार मानताना बेलवंडी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळानी डीजेचा खर्च टाळून गावात सीसीटीव्ही बसवणे,रक्तदान शिबिराचे आयोजन करणे,सेंद्रिय शेती करणे असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला असून त्याचा आदर्श इतर मंडळानी घ्यावा असे सांगून उपस्थितांचे आभार मानले

कार्यक्रमासाठी अप्पर पो अधिक्षक प्रशांत खैरे,कर्जत पो उपाधीक्षक विवेकानंद वाखारे,प्रशिक्षणार्थी पो उपाधीक्षक अरुण पाटील,श्रीगोंदा पो नि ज्ञानेश्वर भोसले उपस्थित होते
डीजे नकोच,पारंपारिक वाद्यांचा वापर करा/-पो अधीक्षकांच्या सूचना डीजे नकोच,पारंपारिक वाद्यांचा वापर करा/-पो अधीक्षकांच्या सूचना Reviewed by Prashasak on सप्टेंबर १४, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.