भीषण अपघात!सहा ठार,२२जखमी


प्रशासक न्यूज,दि.२९जुलै

समृद्धी महामार्गावरील खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच आज पुन्हा एकदा अपघात झाला आहे. मलकापूर शहरातून जाणाऱ्या नागपूर मुंबई हायवे क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हलची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. लक्ष्मीनगर उड्डान पुलावर घटना रात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याचे कळते. या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 22 प्रवासी जखमी झाले. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले

तीर्थयात्रा करून एक ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तीर्थयात्री होते. तर दुसरी ट्रॅव्हल्स नागपूरहून नाशिकच्या दिशेने चालली होती. या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. यावेळी पहाटे 3 वाजता मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहावर दोन्ही बस समोरासमोर धडकल्या. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकल्याने अक्षरशा त्यांचा चुराडा झाला.
पाच जणांचा जागीच मृत्यू, 25 जखमी

या भीषण अपघातत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही ट्रॅव्हल्समधील एकूण 22 प्रवासी जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
भीषण अपघात!सहा ठार,२२जखमी भीषण अपघात!सहा ठार,२२जखमी Reviewed by Prashasak on जुलै २९, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.