'त्या'वादग्रस्त विधान प्रकरणी गुन्हा दाखल


प्रशासक न्यूज,दि.२९जुलै

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले. ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. भिडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली. आता अखेर भिडेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

संभाजी भिडे हे काल अमरावतीत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. महात्मा गांधी यांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवलेत. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.
'त्या'वादग्रस्त विधान प्रकरणी गुन्हा दाखल 'त्या'वादग्रस्त विधान प्रकरणी गुन्हा दाखल Reviewed by Prashasak on जुलै २९, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.