चोरट्यांचा पराक्रम पाहून पोलिसही हादरले!


प्रशासक न्यूज,दि.22मार्च

चोरटे कधी आणि कश्याची चोरी करतील याचा नेम नाही या चोरट्यानंपासून आता मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिलेले नाहीत हे चोरटे आता मंदिरातील देव चोरण्यापासून देखील घाबरत नाहीत

जळगावमध्ये चोरट्यांनी थेट देवाचे डोळे काढले आहेत चोरट्यांचा पराक्रम पाहून पोलिसही हादरले आहेत चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील प्राचीन मुधाई देवीच्या मंदिरात ही चोरीची घटना घडली आहे. मुदाई देवीच्या मूर्तीचे चांदीचे डोळे अज्ञाताने चोरी केले आहेत. या घटनेमुळे वाघळी गावात खळबळ उडाली आहे.

जळगाव मधील मुधाई देवीचे मंदिर हे अतिशय प्राचीन आहे. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिरात घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे



चोरट्यांचा पराक्रम पाहून पोलिसही हादरले! चोरट्यांचा पराक्रम पाहून पोलिसही हादरले! Reviewed by Prashasak on मार्च २१, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.