प्रशासक न्यूज,दि.२५मार्च
येत्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मलाच मिळणार असल्याचे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी आज श्रीगोंद्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले येत्या ३०मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत श्रीगोंदा नगर मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन संवाद यात्रेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घनश्याम शेलार बोलत होते
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस उपस्थित होते
तसेच उमेदवारीबाबत बोलताना मला माझ्या नेत्यांवर पूर्ण विश्वास असल्याचे देखील शेलार यांनी सांगितले
येत्या ३०मार्च ते २५ एप्रिल पर्यत श्रीगोंदा नगर मतदार संघात परिवर्तन संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून शेलार यांच्या वडाळी गावापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे तर २५एप्रिल रोजी श्रीगोंद्यात शेतकरी मेळावा घेऊन या यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच शरद पवार किंवा अजित पवार यांच्यासह
या मेळाव्यास राष्ट्रवादी चे बडे नेते उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले
१९८६ सालापासून श्रीगोंदा मतदार संघातील प्रश्न जैसे थेच आहेत श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीना भरपूर पदे मिळुनसुद्धा तालुक्याचे प्रश्न सुटले नाहीत अशी नाव न घेता आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करत या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून आपण जनतेशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे २७ दिवसांच्या कालावधीत श्रीगोंदा व नगर तालुक्यातील सर्व गावातुन ही परिवर्तन यात्रा जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले
सदर यात्रेसाठी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले
उमेदवारीबाबत आपण एवढे आत्मविश्वासाने कसे सांगताय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नेत्यांनी आपल्याला खात्रीशीर काही गोष्टी सांगितल्या आहेत तसेच मी मागच्या वेळेस अत्यन्त कमी मताने पराभूत झालो तरी मी तालुक्यात संपर्क कमी होऊ दिला नाही त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी मलाच मिळणार असे शेलार म्हणाले
चौकट/-श्रीगोंद्यात राष्ट्रवादीत कुठलीही गटबाजी नाही
श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गटातटाचे राजकारण सुरु असल्याबाबत विचारले असता श्रीगोंद्यात राष्ट्रवादी पक्षात कुठलीही गटबाजी नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले
*साकळाई योजना म्हणजे भाजपसाठी फक्त चुनावी जुमला*
ज्या विखेनी साकळाई योजनेला विरोध केला आज तेच विखे पिता पुत्र साकळाई वर बोलून मतांचे राजकारण करत आहेत मी पाठवपुरावा करून १९९७ साली साकळाई ची फाईल मंजूरीसाठी मंत्रालयात पाठवली आणि आता भाजप या योजनेवरून फक्त चुनावी जुमला करत आहे लोकांची फसवणूक करत आहे म्हणूनच उपमुख्यमंत्र्यांच्या सत्कार सभेतून लोक निघून गेल्याची टीका शेलार यांनी केली
*पालकमंत्र्यांची हुकूमशाही*
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी पालकमंत्र्यांची वेळ घेऊनच विकासकामांचे भूमिपूजन करावे असे पत्र पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतीना काढले आहे त्यामुळे अशी सक्ती करणारे विखे पहिलेच पालकमंत्री असून ग्रामपंचायतीना दिलेले हे पत्र म्हणजे पालकमंत्र्यांची हुकूमशाही असल्याचे शेलार म्हणाले
तसेच श्रीगोंदा तालुक्यात उघड झालेल्या दुधभेसळी बाबत बोलताना जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावीच पण सूडबुद्धीने कुणावर कारवाई होऊ नये असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले येत्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मलाच मिळणार असल्याचे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी आज श्रीगोंद्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले येत्या ३०मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत श्रीगोंदा नगर मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन संवाद यात्रेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घनश्याम शेलार बोलत होते
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस उपस्थित होते
तसेच उमेदवारीबाबत बोलताना मला माझ्या नेत्यांवर पूर्ण विश्वास असल्याचे देखील शेलार यांनी सांगितले
येत्या ३०मार्च ते २५ एप्रिल पर्यत श्रीगोंदा नगर मतदार संघात परिवर्तन संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून शेलार यांच्या वडाळी गावापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे तर २५एप्रिल रोजी श्रीगोंद्यात शेतकरी मेळावा घेऊन या यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच शरद पवार किंवा अजित पवार यांच्यासह
या मेळाव्यास राष्ट्रवादी चे बडे नेते उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले
१९८६ सालापासून श्रीगोंदा मतदार संघातील प्रश्न जैसे थेच आहेत श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीना भरपूर पदे मिळुनसुद्धा तालुक्याचे प्रश्न सुटले नाहीत अशी नाव न घेता आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करत या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून आपण जनतेशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे २७ दिवसांच्या कालावधीत श्रीगोंदा व नगर तालुक्यातील सर्व गावातुन ही परिवर्तन यात्रा जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले
सदर यात्रेसाठी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले
उमेदवारीबाबत आपण एवढे आत्मविश्वासाने कसे सांगताय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नेत्यांनी आपल्याला खात्रीशीर काही गोष्टी सांगितल्या आहेत तसेच मी मागच्या वेळेस अत्यन्त कमी मताने पराभूत झालो तरी मी तालुक्यात संपर्क कमी होऊ दिला नाही त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी मलाच मिळणार असे शेलार म्हणाले
चौकट/-श्रीगोंद्यात राष्ट्रवादीत कुठलीही गटबाजी नाही
श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गटातटाचे राजकारण सुरु असल्याबाबत विचारले असता श्रीगोंद्यात राष्ट्रवादी पक्षात कुठलीही गटबाजी नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले
*साकळाई योजना म्हणजे भाजपसाठी फक्त चुनावी जुमला*
ज्या विखेनी साकळाई योजनेला विरोध केला आज तेच विखे पिता पुत्र साकळाई वर बोलून मतांचे राजकारण करत आहेत मी पाठवपुरावा करून १९९७ साली साकळाई ची फाईल मंजूरीसाठी मंत्रालयात पाठवली आणि आता भाजप या योजनेवरून फक्त चुनावी जुमला करत आहे लोकांची फसवणूक करत आहे म्हणूनच उपमुख्यमंत्र्यांच्या सत्कार सभेतून लोक निघून गेल्याची टीका शेलार यांनी केली
*पालकमंत्र्यांची हुकूमशाही*
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी पालकमंत्र्यांची वेळ घेऊनच विकासकामांचे भूमिपूजन करावे असे पत्र पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतीना काढले आहे त्यामुळे अशी सक्ती करणारे विखे पहिलेच पालकमंत्री असून ग्रामपंचायतीना दिलेले हे पत्र म्हणजे पालकमंत्र्यांची हुकूमशाही असल्याचे शेलार म्हणाले
तसेच श्रीगोंदा तालुक्यात उघड झालेल्या दुधभेसळी बाबत बोलताना जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावीच पण सूडबुद्धीने कुणावर कारवाई होऊ नये असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले
विधानसभेची उमेदवारी मलाच,या नेत्याचे ठाम मत
Reviewed by Prashasak
on
मार्च २५, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च २५, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: