प्रशासक न्यूज,दि.१२मार्च
घराशेजारील शेततळ्यात पडून पाण्यात बुडाल्यामुळे दोन सख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ शिवारात खामकरवाडी येथे आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे आर्यन बंडोपंत साळुंके (वय ७वर्षे)आणि अनिकेत बंडोपंत साळुंके(वय६वर्षे)अशी पाण्यात बुडून मयत झालेल्या चिमुकल्या भावांची नावे आहेत या घटनेबाबाबत पांडुरंग नारायण खेतमाळीस यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
समजलेली माहिती अशी की,लोणीव्यंकनाथ शिवारात राहणारे बंडोपंत सांळुके हे पत्नी सह नेहमी प्रमाणे शेतात कामाला गेले होते आर्यन व अनिकेत हे दोघे भाऊ रविवारची सुट्टी असल्याने घरीच होते आज दुपारी ही दोघे भावंडे त्यांच्या घराशेजारी असलेल्या शेततलावा जवळ खेळत होती खेळता खेळता सुरुवातीला अनिकेत हा शेत तळ्यात पडला हे पाहुन आर्यनने अनिकेतला हात देण्याचा प्रयत्न केला असता आर्यन सुद्धा पाय घसरून तलावात पडला आणि दोघेही भाऊ या दुर्दैवी घटनेत मरण पावले
घटनेची माहिती समजल्यानंतर परिसरातील युवकांनी पाण्यात उड्या मारून दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही या घटनेने लोणीव्यंकनाथ गावात शोककळा पसरली आहे.
आई वडीलांनी आपल्या चिमुकल्या मुलांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला आई वडीलांच्या डोळ्यातील वेदनादायी पाणी पाहून उपस्थितांना देखील अश्रु लपविता आले नाहीत
शेततळ्यात पडून दोन सख्या भावांचा मृत्यू;
Reviewed by Prashasak
on
मार्च १२, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च १२, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: