प्रशासक न्यूज,दि.५ऑक्टोबर
दसऱ्याच्या दिवशीच एक दुःखद घटना घडली आहे बेलवंडी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे सहायक फौजदार सुनील धोंडिबा मोरे वय अंदाजे ५० यांनी श्रीगोंदा शहरातील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे मोरे हे परिवारासह श्रीगोंदा येथे राहात होते ते एक महिन्यांपासून मेडिकल रजेवर असल्याचे समजते
आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मयत मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत ऐन सणासुदीच्या दिवशी एका पोलिस कर्मचाऱ्याने अशी आत्महत्या केल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे
सहायक फौजदाराची आत्महत्या;श्रीगोंदा तालुक्यातील दुःखद घटना
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०४, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०४, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: