स्व.कुंडलिकराव तात्या जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा;राज्यभरातील किर्तनकारांची मांदियाळी


प्रशासक न्यूज,दि.८ऑक्टोबर

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखान्याचे व कुकडी एज्युकेशन सोसायटी पिंपळगाव पिसाचे संस्थापक स्व. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त सावित्रीबाई कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव पिसा येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे दि. 08 आक्टोंबर ते 15 आक्टोंबर 2022 पर्यंत करण्यात आलेले आहे. 

या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. या हरिनाम सप्ताहात ह.भ.प. सोनालीदिदि कर्पे, ह.भ.प. चंद्रकांत खळेकर, ह.भ.प. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर, ह.भ. प. बाळकृष्ण महाराज गिरगावकर, ह.भ.प. अक्रुर महाराज साखरे, ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे हरिकिर्तन होणार आहेत. तसेच काल्याचे किर्तन भागवताचार्य ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांचे होणार आहे

तरी परिसरातील सर्व भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी उपस्थित राहवे असे आवाहन कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्य. सह. बॅंकेचे संचालक मा.आ. राहुलदादा जगताप पा. व कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखान्याचे संचालिका डॉ.प्रणोती राहुलदादा जगताप पाटील यांनी केले आहे.




स्व.कुंडलिकराव तात्या जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा;राज्यभरातील किर्तनकारांची मांदियाळी स्व.कुंडलिकराव तात्या जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा;राज्यभरातील किर्तनकारांची मांदियाळी Reviewed by Prashasak on ऑक्टोबर ०८, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.