पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट असून, मुंबईत आणि रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याची खोटी माहिती दिल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड मधील एका संगणक अभियंत्याला पोलिसांनी अटक केलं आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज अशोक हंसे असं अटक केलेल्या अभियंत्याचं नावं आहे. आरोपी हंसे याने माझ्या घराच्यावरील फ्लॅटमध्ये बॉम्ब बनविण्याचे काम सुरू आहे असा एक फोन पोलीस नियंत्रण कक्षाला केला होता त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले मात्र तिथं तसं काही आढळलं नाही.
त्या बाबत पोलिसांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने पोलिसांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून संबधित आरोपी वैफल्यग्रस्त असल्याने त्याने असं कृत्य केलं असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०८, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: