गॅस टाकी लिकेज होऊन घराला आग,एक जण जखमी


प्रशासक न्यूज,दि.१०ऑक्टोबर

श्रीगोंदा शहरातील मांडवगण रस्त्यावरील शिक्षक कॉलनी परिसरात ग्यास टाकी लिकेज झाल्यामुळे संपूर्ण घराला आग लागल्याची दुर्घटना आज रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडली असून यामध्ये साईनाथ ग्यास एजन्सी चे कर्मचारी ग्यास टाकी वितरण करणारे पवन मखरे हे जखमी झाले आहेत

याबाबत समजलेली प्राथमिक माहिती अशी की,मखरे हे सदर ठिकाणी ग्यास टाकी लिकेज आहे की नाही हे पाहणी करण्यासाठी गेले असता ग्यास टाकीने पेट घेतला त्यामुळे घरात आग लागली घरातले लोक तातडीने घराबाहेर पळाले परंतु ग्यास वितरक कर्मचारी मखरे यांच्या तोंडाला व केसाला दुखापत झाली आहे त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे

घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्राने आग विझवली या दुर्घटनेत घरातले साहित्य जळून खाक झाले असून परिसरात घबराट पसरली आहे

गॅस टाकी लिकेज होऊन घराला आग,एक जण जखमी गॅस टाकी लिकेज होऊन घराला आग,एक जण जखमी Reviewed by Prashasak on ऑक्टोबर १०, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.