पोलीस भरतीसाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत दुर्दैवी घटना


प्रशासक न्यूज,दि.१६सप्टेंबर

पोलीस भर्तीचं स्वप्न बाळगून सकाळी लवकर उठून त्यासाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर - पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भर्तीसाठी व्यायाम करत होते. यावेळी एक अतिशय धक्कादायक घटना घडली. तरुण व्यायाम करत असताना याच मार्गावरून मलकापूर आगाराची बस जात होती. या बसच्या तुटलेल्या पत्र्याचा धक्का लागून पोलीस भर्तीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांचे हात अक्षरशः तुटून पडले.
या बसच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागला. यात दोन तरुणांचे हात कापले गेले. हा अपघात इतका भयानक होता की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून खाली पडले.

विकास गजानन पांडे आणि परमेश्वर पाटील अशी या दोन्ही तरुणांची नावं आहेत. त्यांच्यावर सध्या मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलविल्याची माहिती मिळत आहे.

बुलडाण्यातील मलकापूर - पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भर्तीसाठी व्यायाम करत असताना बसच्या तुटलेल्या पत्र्याचा धक्का लागून दोघांचे हात तुटले

सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे.
पोलीस भरतीसाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत दुर्दैवी घटना पोलीस भरतीसाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत दुर्दैवी घटना Reviewed by Prashasak on सप्टेंबर १५, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.