अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या नाहाटांचा राष्ट्रवादीत प्रवेश


प्रशासक न्यूज,दि.२सप्टेंबर

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजारसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा हे उद्या दि.३ सप्टेंबर रोजी राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या प्रांगणात नाहाटांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे
त्या सभेला विरोधीपक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत त्यावेळी नाहाटा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती बाळासाहेब नाहाटा यांनी प्रशासक न्यूज शी बोलताना दिली तसेच उद्या होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाहटा यांनी केले आहे

---आणि म्हणून प्रवेशाचा निर्णय
अजित पवार यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकाच वेळी राज्य बाजारसमिती महासंघ,मुंबई बाजार समिती याठिकाणी काम करण्याची संधी दिली त्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून २०२४ विधानसभेला श्रीगोंदयात राष्ट्रवादीचाच आमदार असेल त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे बाळासाहेब नाहाटा यांनी प्रशासक न्यूज शी बोलताना सांगितले

अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या नाहाटांचा राष्ट्रवादीत प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या नाहाटांचा राष्ट्रवादीत प्रवेश Reviewed by Prashasak on सप्टेंबर ०१, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.