प्रशासक न्यूज,दि.३१ऑगस्ट
श्रीगोंदा शहरात आज मध्यरात्री दोन ते पहाटेच्या दरम्यान घरफोडी झाल्याची घटना घडली असून यात अंदाजे ६५हजार रुपये रोख रक्कम व एक अर्धा तोळा सोन्याची आंगठी असा एकूण पोलिसांच्या प्राथमिक अंदाजा नुसार सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला आहे
श्रीगोंदा शहरातील मध्यवस्तीत घरफोडीची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे पोलिसांना घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे
शहरातील कासार गल्ली येथील रहिवाशी असणारे एक कुटूंब गरम होत म्हणून रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले होते सकाळी उठल्यानंतर त्यांना त्यांच्या घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसले तसेच घरातून रोख रक्कम व सोन चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली रात्री घराचा दरवाजा उघड ठेवून झोपणे या कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे
घराचा दरवाजा उघड ठेवून झोपन पडलं महागात,मुद्देमाल लंपास
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: