महिना उलटला..छडा लागेना.. ओळख पटेना..पोलिसांसमोर आव्हान!


प्रशासक न्यूज,दि.८डिसेंबर२०२५

श्रीगोंदा शहराजवळील वडाळी रस्त्यावर असलेल्या पठाण बाबा तलावात दि ६ नोव्हेंबर रोजी एका ४०ते ४५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता सदर मृतदेह हा जलचर प्राण्यांनी खाल्ल्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान श्रीगोंदा पोलिसांसमोर होते सदर मृतदेहाच्या परिस्थितीवरून या महिलेचा खूनच झाला असण्याची दाट शक्यता व्यक्त होत होती परंतु एक महिना उलटून सुद्धा अद्याप या मृतदेहाची ओळख पटवण्यात श्रीगोंदा पोलिसांना अपयश आले आहे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण राज्यात याबाबत माहिती पाठवली आहे पण तरी देखील अद्याप कुणी सुद्धा मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुढे आलेले नाही त्यामुळे पोलीस तपासात अडथळा निर्माण झाला असून ओळखच पटत नसल्यामुळे तपासाला ब्रेक लागला आहे

शवविच्छेदन अहवालाबाबत नेमकी माहिती समजली नसली तरी शवविच्छेदन अहवालात मृत्युचे स्पष्ट कारण समजले नसल्यामुळे व्हीसेरा रिपोर्ट आल्यानंतर सदर महिलेचा मृत्यू कश्यामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे तरी सुद्धा प्रथमदर्शनी हा खून असल्याचे दिसून येत आहे

असे असले तरी सदर अनोळखी महिला कुठली तीचा घात कि अपघात हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत त्यामुळे या महिलेची ओळख पटवून हा खुनाचा प्रकार असेल तर त्यातील गुन्हेगार अटक करण्याचे श्रीगोंदा पोलिसांसमोर आव्हान असणार आहे

एक महिना उलटून देखील या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना अपयश येत असल्यामुळे पुढच्या तपासाला खीळ बसली आहे सदर महिलेच्या मृतदेहाबाबत कुठलाच ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही त्यामुळे पोलिसांसमोर या मयत महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे सदर प्रकार हा खुनाचा वाटतं असल्यामुळे त्या दृष्टीने गुन्हा दाखल करून तपास होणे जरुरी आहे
महिना उलटला..छडा लागेना.. ओळख पटेना..पोलिसांसमोर आव्हान! महिना उलटला..छडा लागेना.. ओळख पटेना..पोलिसांसमोर आव्हान! Reviewed by Prashasak on डिसेंबर ०८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.