प्रशासक न्यूज,दि.८ डिसेंबर २०२५
हिरडगाव येथील गौरी शुगर ने चालू गाळपात दोन लाख मे.टन गाळपाचा टप्पा पार केला असून देवदैठण येथील युनिट सुरु करण्यात आले आहे गौरी शुगरने यावर्षी दहा लाख मे.टन ऊस गाळ पाचे उद्दिष्ट ठेवले आहे
या हंगामासाठी गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३२०० रु भाव देणार आहे त्यापैकी पहिला हप्ता ३१०० रु काढणार आहे अशी माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली आहे.
बाबुराव बोत्रेपाटील पुढे म्हणाले की गेल्या वर्षी ३१०६ रु नी भाव आणि ऊसाच्या प्रमाणात दिवाळीला मोफत साखर दिली होती
बाबुराव बोत्रेपाटील पुढे म्हणाले की गेल्या वर्षी ३१०६ रु नी भाव आणि ऊसाच्या प्रमाणात दिवाळीला मोफत साखर दिली होती
*कामगारां सोबतच शेतकऱ्यांची दिवाळी*
यंदा साखर कामगारांना २० टक्केंनी पगार वाढ देण्याचा निर्णय घेतला असून हा आर्थीक भार सहन करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हीत विचारात घेऊन गौरी शुगर ने पहिला हप्ता ३१०० रु नी काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि दिवाळीला १०० रु आणि ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर देण्यात येणार असल्याची माहिती बोत्रे यांनी दिली
*आमची कुणाशीही स्पर्धा नाही*
कोणी किती भाव देते कोणी किती भाव देणार आहे याचा विचार ओंकार शुगर ग्रुप करत नाही आमची कुणाशीही कसलीच स्पर्धा नाही फक्त शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देता येईल हे धोरण आहे असेही बोत्रे पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांनी ऊस द्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक रोहीदास यादव यांनी दिली
"दोन" लाखाचा टप्पा पार... दहा लाख मे.टन गाळपाचे गौरी शुगरचे उद्दिष्ट!
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०८, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०८, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: