प्रशासक न्यूज,दि.१६डिसेंबर२०२५
श्रीगोंदा शहरातील राहिवासी असणारे सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली होती त्यानंतर या चोरीबाबत दि.११डिसेंबर रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता सदर चोरीत शिंदे यांच्या घरातील १३ ग्रॅम सोन्याचे आणि ६ भार वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ६५हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता
त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ आप्पा तरटे यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली तपास करत असताना तक्रारदार शिंदे यांच्या वाहनावरील चालक अभिषेक बाळासाहेब होले हा सध्या हॉटेल वर खूप पैसे उडवत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली त्यानुसार पो हे कॉ तरटे यांनी होले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देत हा गुन्हा भाऊसाहेब पोपट तुपे,मनोज वसंत सकट,जिजाबा संजय ढवळे,विशाल बंडू खराडे सर्व रा.औटेवाडी यांच्या मदतीने केल्याची पोलिसांना कबुली दिली
पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले असून आरोपीनी सदर दागिने पंडित ज्वेलर्स यांना विकल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी सदर ज्वेलर्स कडून चोरीला गेलेला सर्व ६५ हजार रुपये किंमतीचा
१०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे
पो हे कॉ आप्पा तरटे यांनी आणि पोलीस पथकाने चोरीचा काही दिवसात छडा लावत शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे
१०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे
पो हे कॉ आप्पा तरटे यांनी आणि पोलीस पथकाने चोरीचा काही दिवसात छडा लावत शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे
"मालकाच्या" घरी 'चालकाची' चोरी... असा लागला छडा.. पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर १६, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर १६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: