प्रशासक न्यूज,दि.१८डिसेंबर२०२५
मागील काही दिवसांपासून रस्ते अपघातात अनेक महाविद्यालयीन तरुणांनी आपला जीव गमावला आहे काही दिवसांपूर्वीच श्रीगोंद्यातील एका अल्पवयीन मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता त्याच्या अंत्यविधी प्रसंगी एका सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने याबाबत चिंता व्यक्त केली होती आणि हे प्रकार थांबवण्यासाठी पालकांनी लक्ष घालण्याची सूचना केली होती दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असून श्रीगोंदा तालुक्यातील अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत
आज दि १८ रोजी दुपारी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहणाने जोराचे धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र या अपघातात जखमी झाला आहे सदर घटना ही श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा या ठिकाणी आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे
कुणाल शांताराम दरेकर वय-२०वर्षे रा.हिरडगाव असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे तर सुमंत नाना दरेकर वय-२० रा. हिरडगाव हा तरुण या अपघातात जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरु आहेत
सदर अपघाता बाबत समजलेली माहिती अशी कि, आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही तरुण दुचाकीवरून श्रीगोंदा ते हिरडगाव या रस्त्याने जात असताना एका अज्ञात वाहणाने तरुणांच्या दुचाकीला हिरडगाव फाटा परिसरात जोराची धडक दिली या धडकेत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान कुणाल दरेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटने बाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
दुर्दैवी घटना...श्रीगोंदा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच....पुन्हा एका तरुणाचा मृत्यू.. एक जखमी!
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर १८, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर १८, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: