"वाहनचालकांनो"...वाहने जपून चालवा,नियम पाळा...आज पुन्हा एका व्यक्तीने गमावला जीव!


प्रशासक न्यूज,दि.१९डिसेंबर २०२५

श्रीगोंदा तालुक्यात अपघातांची आणि त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे तालुक्यात नव्याने झालेले रस्ते आणि त्यामुळे वाहनांचा वाढलेला वेग,वाहतूकीचे पायदळी तुडवले जाणारे नियम यामुळे अपघातात निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे

दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात कालच हिरडगाव येथील एका वीस वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता ती घटना घडून अजून चोवीस तास उलटत नाहीत तोवरच आज दि.१९ रोजी श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे एका चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे

संतोष किसन मोहिते वय.. ३५ रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा असे या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे

या अपघाता बाबत समजलेली माहिती अशी की आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोहिते हे आपल्या दुचाकीवरून अजनूज रस्त्याने लिंपणगाव येथे आले दुचाकीवरून ते रस्ता ओलांडत असताना त्याचवेळी श्रीगोंदा काष्टी रस्त्याने प्रचंड भरधाव वेगात जाणाऱ्या एका स्कोर्पिओ गाडीने मोहिते यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली ही धडक एवढी जोरात होती की स्कोर्पिओ ने दुचाकीसह मोहिते यांना काही अंतर ओढत नेले त्यामुळे या भीषण अपघातात मोहिते हे गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे खासगी दवाखान्यात नेण्यात आले परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला

मोहिते यांच्या अपघाती मृत्यूमुळे पेडगाव गावावर शोककळा पसरली आहे दिवसेंदिवस होणारे अपघात त्यात जाणारे लोकांचे जीव यामुळे आता सर्वच वाहन चालकांनी काळजी घेऊन वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवून वाहने चालवणे जरुरी आहे

*राशीन येथे पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू*

कर्जत तालुक्यातील राशीन येथे काल रात्री आपले कर्तव्य पार पाडत असताना पोलीस कर्मचारी सुदाम राजू पोकळे यांना रस्ता क्रॉस करताना एका वाहनाने धडक दिल्यामुळे पोकळे यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे पोकळे हे कर्जत पोलीस ठाण्यात कार्यरत होते ते मूळचे आष्टी तालुक्यातील चिंचोळी गावचे राहिवासी होते कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे



"वाहनचालकांनो"...वाहने जपून चालवा,नियम पाळा...आज पुन्हा एका व्यक्तीने गमावला जीव! "वाहनचालकांनो"...वाहने जपून चालवा,नियम पाळा...आज पुन्हा एका व्यक्तीने गमावला जीव! Reviewed by Prashasak on डिसेंबर १९, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.