"तरुणांनो" वेगावर आणि रागावर नियंत्रण ठेवा....अपघाती होणारे मृत्यू वेदनादायी.... सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मौलिक सल्ला आणि...सकारात्मक पाऊल!
प्रशासक न्यूज,दि. ४डिसेंबर२०२५
अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे या अपघातात मृत्यू पावणाऱ्या तरुण मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही अतिशय मनाला वेदना आणि दुःख देणारी घटना आहे
तरुणाच्या अश्या अकाली निधनामुळे त्याच्या आई वडिलांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळतो तरुण मुलगा एकदा मरतो परंतु त्याच्या जाण्यामुळे त्याचे आई वडील मात्र दररोज त्याच्या आठवणीत मरतात आई वडिलांना त्यांच्या मुलांना अग्नीडाग द्यावे लागत आहे हे प्रचंड दुर्दैवी गोष्ट आहे अशी वाईट वेळ कुणावर येऊ नये यासाठी आता पालकांनी सुद्धा जागरूक होऊन आपल्या पाल्याच्या बाबतीत थोडं सजग राहणे जरुरी आहे
याबाबतच आता श्रीगोंदा शहरातील सेवानिवृत्त पोलीस उपाधिक्षक कांतीलाल कोथिंबीरे यांनी अपघातात मृत्यू पावणाऱ्या तरुणांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यावर चिंता व्यक्त करतानाच ते थांबवण्यासाठी पुढाकार घेत आज एका अंत्यविधी प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना तरुणांना वडीलकीचा सल्ला देतानाच आई वडिलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली तसेच याबाबत कुठलीही मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली
तसेच तरुण पिढीला आपल्या रागावर आणि वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे एक भावनिक आवाहन केले तसेच अलीकडे आई वडिल आपल्या मुलांचे नको तेवढे लाड करतात मुलांच्या चुका डोळ्याआड करतात लहान वयात मुलांना वाहने चालवण्यासाठी देतात मुलांना नीट वाहतूकीचे नियम माहित नसताना सुद्धा त्यांच्या हातात वाहने देतात हे अत्यंत चुकीचे आहे त्यावरून त्यांनी अश्या प्रकारे जे आई वडील आपल्या मुलांना कमी वयात वाहने चालवण्यासाठी देतात तेच खरे गुन्हेगार असल्याचे सांगत मुलांचे प्रमाणापेक्षा जास्त आणि नको ते लाड करणाऱ्या आई वडिलांना खडे बोल सुनावले आपल्या मुलाच्या चुका पाठीशी घालू नका त्याच्या वागणुकीवर लक्ष देत लहान वयात वाहने मुलांच्या ताब्यात देऊ नका असे सांगतानाचा अलीकडच्या तरुणामध्ये वाढत चाललेले रागाचे प्रमाण त्यातून होणारे वाद वाहन चालवताना तरुणांकडून होणारा हलगर्जीपणा त्यातून होणारे अपघात आणि त्या कुटुंबावर दुःखाचा होणारा मोठा आघात हे खूप वेदनादायी असल्याचे सांगत या बाबत चिंता व्यक्त करत तरुणांना मौलिक सल्ला दिला तसेच कुणाची मुले जर आई वडिलांचे ऐकत नसतील तर मला भेटा मी मदत करतो मार्गदर्शन करतो असे माणुसकीचे आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केले
दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघात त्यात तरुण वयात मुलांना गमवावा लागणार जीव या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारे तरुणांचे आणि त्यांच्या आई वडिलांचे प्रबोधन होणे हे गरजेचे असून त्यासाठी आज सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पुढे येऊन टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल निश्चितच कौतुकाची बाब म्हणावी लागेल
"तरुणांनो" वेगावर आणि रागावर नियंत्रण ठेवा....अपघाती होणारे मृत्यू वेदनादायी.... सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मौलिक सल्ला आणि...सकारात्मक पाऊल!
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०४, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०४, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: