भ्रष्टाचार उघड केल्याचा राग...मुलींना मानसिक त्रास...श्रीगोंद्यातील "ती" वादग्रस्त मुख्याध्यापिका अखेर निलंबीत!
प्रशासक न्यूज,दि.८जुलै२०२५
श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक शाळेत झालेला पीएमश्री अनुदान योजना आणि शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचार सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी उजेडात आणला होता पीएमश्री योजना अनुदानातील भ्रष्टाचाराबाबत टिळक भोस यांनी दि.२६जून रोजी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रार अर्ज दीला होता तर अरविंद कापसे यांनी सदर शाळेत जात फेसबुक लाईव्ह करत शालेय पोषण आहाराच्या तांदळातील अपहार सर्वांसमोर आणला होता तसेच या अपहाराबाबत त्यांनी दि.४जुलै रोजी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार अर्ज केला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने या अपहाराच्या प्रकाराची चौकशी सुरु होती त्याचाच राग मनात धरून मुख्याध्यापिका वसुंधरा मधुकर जगताप यांनी सदर अपहार उघड करणारे आणि तक्रार अर्ज देणारे टिळक भोस यांची दुसरीत शिकणारी मुलगी वीरा टिळक भोस आणि दुसरे तक्रारदार अरविंद कापसे यांची याच शाळेत चौथी इयत्तेत शिकणारी मुलगी जिजा अरविंद कापसे या दोघीना दि ४जुलै रोजी शाळेत परिपाठ सुरु असताना माईक वरून जोर जोर जोरात बोलून या दोन्ही मुलींना उठवून तुम्हाला लोक नाव ठेवतील तुमचा बाप सरकारी कार्यलयात खोट्या तक्रारी करतात म्हणून तुम्हाला लोक नाव ठेवतील असे म्हणत तुम्ही दोघी दिंडी मध्ये नारदमुनीचा वेष घालून या असे म्हणत त्या मुलींना ओरडल्या त्या प्रकारामुळे दोन्ही मुली घाबरल्या आणि त्यांनी भीतीपोटी शाळेत जाण्यास नकार दीला या सर्व घटनेच्या निषेधार्थ आणि सदर मुख्याध्यापिकेने केलेल्या गैरकारभारा बाबत त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आज दिवसभर या दोन्ही विद्यार्थिनीनी आपल्या पालकांसह श्रीगोंदा पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केले
अश्या प्रकारे वडिलांनी भ्रष्टाचार उघड केला म्हणून त्यांच्या छोट्या मुलींशी सूड बुद्धीने वागणाऱ्या शिक्षिकेच्या या कृतिबद्दल सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे
*आंदोलनाला यश मुख्याध्यापिका निलंबीत*
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील अनियमितता,आर्थिक अभिलेख अद्यावत नसणे,मुख्याध्यापक पदाच्या कर्तव्यात कसूर करणे,गैरवर्तन करणे या सर्व बाबत दोषी धरत त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी मुख्याध्यापिका जगताप यांना अखेर आज सेवेतून निलंबीत केले आहे त्यांची राहुरी पंचायत समिती मुख्यालयात बदली केली आहे
आज झालेल्या ठिय्या आंदोलनात टिळक भोस,अरविंद कापसे,विलास रसाळ, रामदास नन्नवरे ,नाना शिंदे, अरविंद चव्हाण, सुनील ढवळे, सुनिल ढवळे, गणेश पारे, शाम जरे, सतीश बोरुडे, प्रदीप ढवळे, तौसीम शेख,संदीप साळवे हे सहभागी झाले होते
*आंदोलनाला यश मुख्याध्यापिका निलंबीत*
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील अनियमितता,आर्थिक अभिलेख अद्यावत नसणे,मुख्याध्यापक पदाच्या कर्तव्यात कसूर करणे,गैरवर्तन करणे या सर्व बाबत दोषी धरत त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी मुख्याध्यापिका जगताप यांना अखेर आज सेवेतून निलंबीत केले आहे त्यांची राहुरी पंचायत समिती मुख्यालयात बदली केली आहे
आज झालेल्या ठिय्या आंदोलनात टिळक भोस,अरविंद कापसे,विलास रसाळ, रामदास नन्नवरे ,नाना शिंदे, अरविंद चव्हाण, सुनील ढवळे, सुनिल ढवळे, गणेश पारे, शाम जरे, सतीश बोरुडे, प्रदीप ढवळे, तौसीम शेख,संदीप साळवे हे सहभागी झाले होते
भ्रष्टाचार उघड केल्याचा राग...मुलींना मानसिक त्रास...श्रीगोंद्यातील "ती" वादग्रस्त मुख्याध्यापिका अखेर निलंबीत!
Reviewed by Prashasak
on
जुलै ०८, २०२५
Rating:
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: