प्रशासक न्यूज,दि.८जुलै २०२५
जिल्ह्यातील फोफावलेल्या अवैध धंद्याना ब्रेक लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी परीवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाची नेमणूक केली असून खाडेंच्या या पथकाचा कारवाईचा धडाका सुरूच आहे दोन ते तीन दिवसांपूर्वी कर्जत त्यानंतर श्रीगोंद्यात गुटख्यावर कारवाई केल्यानंतर काल देखील याच पथकाने पारनेर या ठिकाणी गुटख्याचा जवळपास पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला तर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी हद्दीत देखील काल याच पथकाने ६०ते ७० हजार रुपयांचा गुटखा जप्त करत कारवाई केली होती याच कारवाईत सातत्य ठेवत पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने आज कोपरगाव या ठिकाणी समृद्धी महामार्गावर जाणारा गुटख्याचा ट्रक पकडत ६५लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि एक आयशर टेम्पो असा एकूण ७७लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत एक आरोपी अटक केला आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहिती दिली आहे
सदर गुटखा हा अमरावतीवरून आला होता तो अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर भागात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे
...खाडेंचा धडाका सुरूच... पुन्हा मोठी कारवाई!
Reviewed by Prashasak
on
जुलै ०८, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: