प्रशासक न्यूज,दि.८जुलै२०२५
वाहन चालकांच्या वेळेची आणी इंधनाची बचत व्हावी प्रवास सुखकर व्हावा म्हणून शासनाने चांगले रस्ते बनवले आहेत परंतु या चांगल्या रस्त्यामुळे वाहनांचा वेग वाढला असून अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे नगर दौंड रस्त्यावर आज दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास एका कारचा टायर फुटल्यामुळे कार पलटी होऊन कार मधील एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे घटनेबाबत प्राथमिक समजलेली माहिती अशी की अहिल्यानगर येथील केडगाव येथील एक कारचालक आज दुपारी सदर रस्त्याने भरधाव वेगात दौंडच्या दिशेने जात असताना घारगाव नजीक त्यांची टाटा कंपनीच्या नेकसोन कारचा टायर फुटला टायर फुटल्यानंतर ती कार डीव्हायडरला धडकून पलटी झाली त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत जखमी कारचालकाला बाहेर काढत उपचारासाठी दवाखान्यात पाठवले
सुदैवाने गाडीत एकटाच व्यक्ती असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली कारचालकाच्या हाताला आणी पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली
पुन्हा अपघात,भरधाव वेग आणि.... श्रीगोंदा तालुक्यातील घटना!
Reviewed by Prashasak
on
जुलै ०८, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: