प्रशासक न्यूज,दि.८जुलै २०२५
श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून अनेक गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या इन्फिनिटी बीकॉन(Infinity beacon)या कंपनीविरोधात त्यातील संचालक आणि काही एजंट लोकांविरोधात काल रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
कर्जत तालुक्यातील मांदळी येथील प्राथमिक शिक्षक नितीन अंबादास गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून सदर कंपनीचे 1) नवनाथ जगन्नाथ औताडे, रा. फलवानी, ता. माळशिरस, जि. सोलापुर, 2) अगस्त मिश्रा, रा. सदनिका क्र. 1003 सांरग सोसायटी, नांदेड सिटी पुणे, 3) राहुल शामराव काळोखे, रा.प्लॉट नं. 120 श्री निवास, गुरुनाम मार्ग संभाजीनगर, दिघी पुणे, 4) गौरव देविदास सुखदिवे रा. लेबर कॉलनी सिद्धार्थनगर, अकोला, 5) प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी, रा. सदनिका क्र. 1003 सांरग सोसायटी, नांदेड सिटी पुणे, 6) सचिन लक्ष्मण खडतरे (पत्ता माहीती नाही) 7) ययाती मिश्रा (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) 8) शुभम नवनाथ औताडे, रा. फलवानी, ता. माळशिरस, जि. सोलापुर, 9) सुवर्णा नवनाथ औताडे, रा. फलवानी, ता. माळशिरस, जि. सोलापुर, एजन्ट 10) रंगनाथ तुळशीराम गलांडे रा. देवुळगाव गलांडे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, 11) अनिल झुंबर दरेकर, 12) संदीप संपत दरेकर, दोन्ही रा. हिरडगाव,ता.श्रीगोंदा या बारा जणांविरोधात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गांगर्डे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे वरील लोकांनी संगणमत करून तुम्ही तुम्ही इन्फिनिटी बीकॉन या कंपनीमध्ये गुंतवणूक करा त्याबद्दल्यात तुम्हाला महिन्याला ६ते ८ टक्के एवढा परतावा दीला जाईल असे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितले त्यावर विश्वास ठेवत फिर्यादी गांगर्डे यांनी ७३,५०,०००रुपये एवढी रक्कम सदर कंपनीत गुंतवली परंतु त्यांना त्यावर कुठलाही परतावा मिळाला नाही त्यांची रक्कम परत मागितली असता त्यांना संबंधित लोकांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्यामुळे आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काल गांगर्डे यांनी या कंपनी विरोधात तक्रार नोंदवली आहे
*पोलीस स्टेशनला तक्रारदारांची गर्दी.. व्याप्ती मोठी*
इन्फिनिटी बीकॉन या कंपनीत श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य लोकांपासून ते अनेक शासकीय नोकरदार,व्यापारी, राजकीय नेते,पदाधिकारी यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केलेली आहे काही लोकांनी तर जादा परतावा मिळण्याच्या आमिषाने आपली आयुष्यभराची पुंजी या कंपनीत गुंतवली आहे तर काहींनी बँकेचे कर्ज घेत आपली मोठी रक्कम या कंपनीकडे मोठ्या विश्वासाने गुंतवली आहे
परंतु या कंपनीतून पैसे परत मिळत नसल्यामुळे अनेक जन व्यथीत झालेले असतानाच काल याबाबत पहिला गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अनेक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षकानपुढे कैफित मांडली त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी अनेक एजंट लोकांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले होते त्यामुळे अजून या प्रकरणात अनेक तक्रार दार समोर येऊन या कंपनी व एजंट लोकांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून या आर्थिक फसवणूकीची व्याप्ती ही खूपच मोठी असून काही हजार कोटी रुपयांमध्ये हा आकडा असल्याचे बोलले जात आहे
अखेर ''त्या' कंपनीविरोधात पहिला गुन्हा दाखल.. अनेकांची पोलीस ठाण्यात धाव.. व्याप्ती मोठी!
Reviewed by Prashasak
on
जुलै ०७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: