कारवाई मागचे "विशेष" काय.... 'त्या' पथकाच्या धडक कारवायांमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीची पोलखोल!


प्रशासक न्यूज,दि.६जुलै २०२५

अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पोलीस पथकाची नियुक्ती केली या पथकाने मागील काही दिवसात नगर जिल्ह्यात विविध तालुक्यात छापे टाकत अनेक अवैध धंद्यानवर कारवाई करत लाखो रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद केले आहेत या विशेष पथकाच्या कारवाई मुळे स्थानिक पोलिसांची आणि अवैध व्यवसायिकांची छुपी युती असल्याची पोलखोल झाली आहे तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने जोरदार धंधे सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे

जिल्ह्यात अश्या प्रकारे कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आधीच कार्यरत असताना सुद्धा पोलीस अधीक्षकांना नव्याने विशेष पथकाची नेमणूक का करावी लागली यावर देखील अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत

पोलीस अधीक्षकांचा देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धती वर विश्वास राहिलेला नाही का?असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे

श्रीगोंदा शहरात पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर या विशेष पथकाने अत्यंत चालाकीने छापा टाकत मोठा मुद्देमाल आणि मोठ्या संख्येने आरोपी जेरबंद केले परंतु या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे शहरात एवढ्या जवळ चालू असलेल्या या जुगार अड्डयाबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती नव्हते का?आणि जर माहित असेल तर पोलिसांनी कारवाई का केली नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत

त्यातच काल पुन्हा या विशेष पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडत एक आरोपी जेरबंद केला मग या गुटख्या बाबत श्रीगोंदा पोलिसांना खरच काही माहित नव्हते का असा सवाल आता उपस्थित होत आहे

*विशेष पथकाचा कारवाईचा धडाका..स्थानिक पोलिसांची पोलखोल*

विशेष पथकाने अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु केल्यामुळे श्रीगोंदा पोलिसांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीची पोलखोल झाली आहे विशेष पथकाच्या या दोनच कारवायांमुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत किती मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत याची फक्त झलक पाहायला मिळाली आहे त्यामुळे जर विशेष पथक श्रीगोंद्यात येऊन धडक कारवाई करत असेल तर मग श्रीगोंदा पोलीस कारवाई का करत नाहीत किंवा त्यांना अश्या कारवाया करण्यात नेमकी अडचण काय याचे कारण देखील अद्याप गुलदस्त्यात आहे

*ती आमची जबाबदारी नाही असे म्हणणारेच मोठा मलिदा लाटण्यात पुढे*

विविध अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी विविध खाते आहेत त्यामुळे सगळ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी आमची नाही असे म्हणत श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील जबाबदार पोलीस अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत परंतु कारवाई करण्याची जबाबदारी झटकणारे हेच पोलीस सर्व अवैध व्यवसायिकांकडून मलिदा लाटण्यात मात्र अग्रेसर असल्याचे दिसून येते तसेच ही जबाबदारी पोलिसांची नाही असे जर कुणी पोलीस अधिकारी म्हणत असतील तर मग त्याच अवैध धंद्यांवर विशेष पोलीस पथक कारवाई कशी काय करतय हेही न उलगडणारे कोडे आहे

*कारवाईत सातत्य किती दिवस राहणार*

विशेष पथकाने सुरु केलेल्या कारवाई मागचे विशेष काय आणि या कारवाईत अजून किती दिवस सातत्य राहणार हे पथक किती दिवस अस्तित्वात राहणार असाही प्रश्न निर्माण होत आहे पोलीस अधीक्षक नव्याने रुजू झाल्यामुळे काही दिवसांसाठी तर हा कारवायांचा फार्स राबवला जात नाही ना याबाबत देखील शंका कुशंका उपस्थित होत असून इथून पुढे खरच सगळे अवैध धंधे बंद होणार का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे

कारवाई मागचे "विशेष" काय.... 'त्या' पथकाच्या धडक कारवायांमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीची पोलखोल! कारवाई मागचे "विशेष" काय.... 'त्या' पथकाच्या धडक कारवायांमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीची पोलखोल! Reviewed by Prashasak on जुलै ०५, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.