नागरिकांचा पाठलाग आणि चोरटे... श्रीगोंदा तालुक्यात रंगला थरार!


प्रशासक न्यूज,दि.५जुलै २०२५

श्रीगोंदा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे पोलीस चोरट्याना जेरबंद करण्यात अपयशी ठरत असतानाच नागरिकांनी जागरूकता दाखवत तीन चोरटे पोलिसांना पकडून दिले आहेत नागरिक आणि चोरांच्या पाठलागाचे हे थरारनाट्य श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यँकनाथ गावच्या शिवारात दि.४जुलै रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रंगले आहे

श्रीगोंदा तालुक्यातील नगर- दौंड महामार्गालगत लोणी व्यंकनाथ गावच्या शिवारात महालक्ष्मी पेट्रोलपंपा जवळ हॉटेल रंगीला नजीक एक ट्रक चालक रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मोबाइल चार्जिंग ला लावून झोपलेला असताना तीन ते चार इसमांनी ट्रक मधून चालकाचा मोबाईल चोरला त्यावेळी मोबाईल च्या चार्जिंग डिसकनेक्ट बीप ने चालकाला अचानक जाग आली व चोरट्यांना पाहून त्याने आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी चालकावर दगडफेक केली.

या घटनेबाबत माहिती समजताच लोणी गावचे पोलीस पाटील मनेष जगताप यांनी इतर नागरिकांसोबत बराच वेळ या चोरट्यांचा वाहनाने पाठलाग केला पाठलाग करत असताना चोरट्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.या घटनेची पोलिसांना माहिती समजल्या नंतर सहायक पो निरीक्षक प्रभाकर निकम, पो ना भागवत,मनोज साखरे,चालक साळवे असे घटना ठिकाणाकडे तात्काळ पोहोचले. पोलीस पाटील मनेश जगताप व इतर नागरिकांनी मोठ्या शिताफीने पळून जाणारे तीन चोरटे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.ट्रक चालकाचा चोरी गेलेला मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.

तीन चोरटे पळून जात असताना दुचाकीला अपघात होऊन पडल्याने जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

परप्रांतीय ट्रक चालक सुरेंद्रकुमार प्रजापती यांच्या फिर्यादीवरून राजु ऊर्फ राजवीर लक्ष्मण भोसले,आप्पा लक्ष्मण भोसले,ईशा लक्ष्मण भोसले, सर्व रा. श्रीगोंदा फॅक्टरी,यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांचा पाठलाग आणि चोरटे... श्रीगोंदा तालुक्यात रंगला थरार! नागरिकांचा पाठलाग आणि चोरटे... श्रीगोंदा तालुक्यात रंगला थरार! Reviewed by Prashasak on जुलै ०४, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.