प्रशासक न्यूज,दि.२जुलै२०२५
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात मागील काही दिवसांपासून घरफोडी,दरोडा,चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे असे असताना सुद्धा श्रीगोंदा पोलिसांच्या मंदावलेल्या कार्यपद्धतीमुळे या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे चित्र आहे
चांडगाव दरोडा,लिंपणगाव येथील ग्रामदैवताच्या मंदिरात झालेली चोरीचा घटना ताजी असतानाच तालुक्यातील मांडवगण रस्त्यावर काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका पेट्रोलपंपावरून भरणा करण्यासाठी चालवलेली २लाख २०हजार रुपयांची रोकड चोरट्यानी पळवून नेल्याची घटना घडली आहे त्यामुळे या घटनाना पोलीस नेमका कधी ब्रेक लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
चांडगाव या ठिकाणी पडलेला दरोडा,लिंपणगाव येथील ग्रामदैवताच्या मंदिरात झालेली चोरी या घटनांसह आनंदवाडी येथे झालेली चोरी,शहरातील एका व्यक्तीच्या दुचाकीतून पळवलेली रोकड,भरदिवसा रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून नेल्याची घटना,यासह शहरात अनेक ठिकाण मागील काही महिन्यात घरफोडी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसत आहे
या सर्व घटनांबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असताना सुद्धा यातील अनेक चोरी आणि दरोड्याच्या घटनेतील आरोपी जेरबंद करण्यात श्रीगोंदा पोलिसांना अपयश आले आहे त्यामुळे तालुक्यातील जनता असुरक्षित झाली असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या दरोडा चोरीच्या घटनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत
डिबी पथक नेमक करतय काय?
गुन्ह्यांचा तपास वेगाने व्हावा,आरोपी लवकर जेरबंद व्हावेत,गुन्ह्यांची निर्गती झपाट्याने व्हावी पोलीस तपासाला गती मिळावी यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एक अधिकारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचे गुन्हे प्रगटीकरणं शाखा(डिबी पथक)अस्तित्वात आहे पण अनेक गुन्ह्यांचा प्रलंबीत तपास,अनेक चोरीच्या घटनेत सि्सिटिव्हीत कैद झालेले आरोपी देखील जेरबंद करण्यात आलेले अपयश या सगळ्या गोष्टी बघता श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील डिबी पथक नेमक करतय काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे गुन्ह्यांच्या तपासासाठी कार्यरत असणाऱ्या या शाखेची मागील काही दिवसातील कामागिरी पाहता ही शाखा नेमकी कोणत्या गोष्टीसाठी अस्तित्वात आहे असा प्रश्न निर्माण होत आहे
*दरोडा,चोरीच्या थांबलेल्या घटना पुन्हा सुरु*
मागील काही वर्षात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या काही कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करत अनेक चोर दरोडेखोरांच्या टोळ्या जेरबंद केल्या होत्या या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोंबिंग ऑपरेशन करत अनेक रेकॉर्डवरील अपराधी जेरबंद करत श्रीगोंदा तालुक्यातील दरोडा आणि चोऱ्यांचे सत्र पूर्णपणे थांबवले होते ड्राफ्ट च्या घटनेत सुद्धा कडक कारवाई केल्यामुळे त्या घटना थांबवल्या होत्या परंतु मागील एक वर्ष्यातील गुन्हेगारीच्या घटना बघता चोरी दरोड्याच्या वाढलेल्या घटना पाहता हे सत्र पुन्हा सुरु झाले असून याला पोलिसांची निष्क्रिय कार्यपद्धती जबाबदार असल्याचे बोलले जात आहे
या सर्व घटनेतील आरोपी जेरबंद करण्याचे आव्हान श्रीगोंदा पोलिसांसमोर आहे त्यामुळे पोलिसांनी आतातरी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे जरुरी आहे
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एखादी घटना घडली की त्याबाबत गुन्हा दाखल करण्या ऐवजी ही पोलिसांची जबाबदारी नाही तो पोलिसांचा अधिकार नाही असे सांगण्यातच पोलीस अधिकारी धन्यता मानत आपली जबाबदारी झटकत आहेत आणि गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत अनेकवेळा तर तक्रार घेऊन जाणाऱ्यालाच कायद्याचे ज्ञान शिकवून त्याला दुसरा मार्ग दाखवला जात आहे त्यामुळे जनता पोलिसांच्या या कार्यपद्धतीला वैतागली आहे त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करत गुन्ह्यांचा तपास वेगाने करत आरोपी जेरबंद करावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत
श्रीगोंदेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.... पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
Reviewed by Prashasak
on
जुलै ०२, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: