ग्रामदैवताच्या मंदिरात चोरी.. श्रीगोंदा तालुक्यातील घटना!


प्रशासक न्यूज,दि.१जून२०२५

श्रीगोंदा तालुक्यात सुरु झालेले चोरी आणि दरोड्याचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत चांडगाव या ठिकाणी दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव गावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

आज सकाळी मंदिराचे पुजारी मंदिर उघडण्यासाठी तिथे गेले असता मंदिरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे

मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेवून चोरटा पसार झाला आहे सदर घटनबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत ग्रामदैवताच्या मंदिरात चोरी झाल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत त्यामुळे सदर चोरटा लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे
ग्रामदैवताच्या मंदिरात चोरी.. श्रीगोंदा तालुक्यातील घटना! ग्रामदैवताच्या मंदिरात चोरी.. श्रीगोंदा तालुक्यातील घटना! Reviewed by Prashasak on जून ३०, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.