प्रशासक न्यूज,दि.२८जून२०२५
श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव गावातील सायकर वस्तीवर आज रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास जवळपास सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकत दत्तात्रय वाघ व त्यांच्या पत्नी यांना कुऱ्हाडीने व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे दरोडेखोरांच्या मारहाणीत वाघ पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीगोंद्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत
दरोडेखोरांनी कानातले व गळ्यातले असे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला हे सविस्तर समजले नाही पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज रात्रीच्या वेळी वाघ दांपत्य एका खोलीत झोपले होते दुसऱ्या खोलीत वाघ यांच्या आई झोपलेल्या होत्या मध्यरात्रीच्या वेळेस तोंड बांधून आलेल्या सहा दरोडेखोरांनी वाघ यांच्या घरात प्रवेश करत वाघ यांच्या आई झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावली त्यानंतर या चोरट्यानी वाघ पती पत्नीला कुऱ्हाडीने, दांड्याने जबर मारहाण केली आरडा ओरडा झाल्यानंतर चोरटे पळून गेले त्यानंतर लोकांनी वाघ यांना दवाखाण्यात नेले
दरोड्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे
श्रीगोंदा तालुका हादरला... पती पत्नी गंभीर जखमी!
Reviewed by Prashasak
on
जून २७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: