प्रशासक न्यूज,दि.२७जून २०२५
श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत आणि हजारो लोकांचे श्रद्धास्थान असणारे संत शेख महंमद महाराज यांच्या श्रीगोंदा ते पंढरपूर पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले यावेळी आपल्या ग्रामदैवताला निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता दिंडी सोहळ्याचे हे तिसरे वर्षे आहे संत शेख महंमद महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या काळातील समकालीन संत असल्यामुळे या दिंडी सोहळ्याला विशेष महत्व आहे
टाळ मृदूंगाच्या गजरात आणि तीन बँड वर सुरु असलेल्या भक्तीगीतांच्या सुरात आणि हजारो महिला-पुरुष भाविकांच्या उपस्थितीत आज सकाळी या दिंडीचे प्रस्थान झाले शेख महंमद महाराज मंदिरापासून डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला,खांद्यावर भगवा पताका घेतलेले पुरुष,वारकरी पोशाख परिधान केलेले अनेक तरुण,सुंदर फुलांनी सजावट केलेला रथ,देखणा आश्व हे आजच्या दिंडीचे आकर्षण ठरले दिंडीच्या प्रस्थान मार्गांवर स्वागतासाठी शहरात अनेक व्यापारी आणि नागरिक,महिलांनी आपल्या घरासमोर सडा टाकत मोठ मोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या शहरात अनेक ठिकाणी लोकांनी दिंडीचे मोठ्या भक्तीभावात स्वागत केले शहरातील अनेक भागात दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी,चहा आणि केळीचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले
शेख महंमद महाराज मंदिरापासून सकाळी सुरु झालेला हा पालखी सोहळा शहरातील विविध चौकातून मार्गस्थ होत शनी चौकमार्गे शहरातील राम मंदिर परिसरातील बाजारतळावर पोहोचला त्याठिकाणी या दिंडीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न झाला त्यानंतर साळवण देवी मंदिरात थोडा विसावा घेत दिंडी शेडगाव कडे पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाली
पालखी सोहळ्यातील रथासाठी लावलेली आकर्षक बैलजोडी सर्वांचे लक्षवेधून घेत होती तसेच स्व आ.अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ सचिन जगताप यांनी दिंडी सोहळ्यासाठी दिलेली आणि रथासमोर चाललेली नगारा गाडी देखील सर्वांचं लक्षवेधून घेत होती
*महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती*
आजच्या पालखी सोहळ्यात पुरुषांपेक्षा महिला वारकऱ्यांची आलोट गर्दी आल्याचे पाहायला मिळाले दिंडी सोहळ्यात एवढ्या मोठ्या संख्येने असलेली महिलांची संख्या लक्षणीय ठरली ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत बँडवर वाजवल्या जाणाऱ्या भक्तीगीतांवर महिलांनी चांगलाच ठेका धरला तर काहींनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला
'ग्रामदैवताला' निरोप देण्यासाठी लोटला अथांग जनसागर!
Reviewed by Prashasak
on
जून २७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: