प्रशासक न्यूज,दि.२६जून२०२५
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीराम मल्टीस्टेट मल्टीपर्पज को - ऑपरेटीव्ह सोसायटी लि. वांगदरी ( महाराष्ट्र व कर्नाटक ) या संस्थेच्या सन २०२५ ते २०३० पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थेच्या चेअरमनपदी नागवडे विश्वास भुजंगराव यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. खराडे विजय लक्ष्मण यांची नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दि.२४जून रोजी श्रीराम मल्टीस्टेट मल्टीपर्पज को – ऑपरेटीव्ह सोसायटी चालू पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अहिल्यानगर श्री. पंकज आशिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक श्री. एन.ए. परजणे अभिमन्यू थोरात व मुढे एन. बी व नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र (दादा) नागवडे व संस्थेचे संस्थापक श्री. नागवडे दिपकशेठ शिवाजीराव यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलविली असता चेअरमनपदी श्री. नागवडे विश्वास भुजंगराव यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. खराडे विजय लक्ष्मण यांची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याने संस्थेच्या सभासदांनी आनंद व्यक्त केला.
या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक निवडीनंतर नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र (दादा) नागवडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह नवनिर्वाचित नागवडे आदेश भुजंगराव, पवार प्रवीण दादासाहेब, कापडे सचिन अरुण, शिर्के प्रवीण रंगनाथ, तावरे प्रदीप प्रकाश, उदमले अभंग विलास, नागवडे सौरभ बाळासाहेब, सौ. नागवडे माधुरी आदेश, सौ. हराळ ज्योती संदीप या पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. याकार्याक्रमाचे सूत्रसंचालन संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी दातीर संतोष रावसाहेब यांनी केले तर उपस्थित सभासदांचे आभार डोळस विनोद विठ्ठल यांनी मानले.
"श्रीराम" मल्टिस्टेट च्या अध्यक्षपदी नागवडे तर उपाध्यक्षपदी खराडे यांची बिनविरोध निवड!
Reviewed by Prashasak
on
जून २६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: