प्रशासक न्यूज,दि.२६जून२०२५
बिगबॉस फेम श्रीगोंद्याचा छोटा पुढारी घनश्याम दरवडे रा टाकळी लोणार याच्या निधनाचा खोटा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत दरवडे यांना श्रध्दांजली वाहिल्याची पोस्ट काही जणांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती त्या आक्षेपार्ह पोस्ट बाबत तक्रार दाखल करण्यासाठी घनश्याम दरवडे यांनी आज श्रीगोंदा पोलीस स्टेशनला येऊन संबंधित यु ट्यूब च्यानेल व त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज देत संबंधितावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे त्यावर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
दरवडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटल्याप्रमाणे सांगली येथील सगळी गाणी वाजणार चॅनेल आणि आर जे सोहम या यु ट्युब चॅनलच्या विरोधात बदनामी केल्याबाबत दरवडे यांनी तक्रार दिली आहे
सदर व्यक्तींनी बदनामी केल्यामुळे आपले बुकिंग केलेले कार्यक्रम रद्द झाले असून माझे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे समाजात बदनामी झाली आहे त्यामुळे या युट्युब चॅनेल वाल्यांनी दहा लाखाची नुकसान भरपाई द्यावी असा दावाही दरवडे यांनी केला आहे या सर्व घटनेमुळे आपण प्रचंड व्यथित झालो असून या व्यक्तींना अटक करून त्यांचे चॅनेल बंद न केल्यास पोलीस स्टेशन बाहेर आत्मदहन करण्याचा इशारा घनश्याम दरवडे यांनी दीला आहे
छोटा पुढारी संतापला... पोलीस स्टेशन समोरच आत्मदहन करण्याचा ईशारा!
Reviewed by Prashasak
on
जून २६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: