तरी 'त्या' ठेकेदारावर नगरपरिषद मेहेरबान का?पालिकेचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि...


प्रशासक न्यूज,दि.२१जून२०२५

श्रीगोंदा शहरातील आंतर्गत रस्ते दुरुस्ती डागडुजी चा ठेका असलेला संबंधित ठेकेदार बोगस कामे करण्यात माहीर असल्याची माहिती आता समोर येत आहे या ठेकेदाराने केलेल्या कामांबाबत नेहमीच ओरड आल्याचे ऐकायला मिळत आहे असे असूनसुद्धा बोगस कामे करण्यात माहीर असण्याऱ्या या ठेकेदारावर श्रीगोंदा नगरपरिषदेची एवढी मेहेरबानी कश्यासाठी हे मात्र समजायला तयार नाही निकृष्ट दर्जाहीन कामे करुनसुद्धा नगरपरिषदेकडून त्याच व्यक्तीला कामाचा ठेका का दीला जातोय हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे

शहरातील बायपास रस्त्यावरील बुजवलेल्या खड्ड्याची खडी काल काही तासातच रस्त्यावर आली मिरची हॉटेल नजीक बायपास ला मुख्य रस्त्यावरच चर खांदल्यामुळे भला मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही नगरपरिषदेने अश्या प्रकारे रस्त्याला चर खांदणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे जरुरी होते पण तसे झाले नाही

आता जो ठेकेदार या रस्त्यावरील खड्डे बुजवतोय त्याने अतिशय निकृष्ट पद्धतीने खड्डे बुजवल्यामुळे सदर खड्डा देखील लगेच उघडा पडला असून या खड्ड्यातून वाट काढतांना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे आज बुजवलेला खड्डा परत लगेच दुसऱ्या दिवशीच जैसे थे झाल्यामुळे वाहनचालकानंमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे

सदर ठेकेदाराने या आधी देखील पारगाव रस्त्यासह अनेक ठिकाणी रस्त्याची डागडुजी करताना बोगस पद्धतीने काम करून फक्त लाखो रुपयांची बिले लाटण्याचे काम केल्याची माहिती समजतं आहे पारगाव रस्त्यावर अनेकदा डागडुजी करुनसुद्धा या रस्त्यावरील खड्डे बुजण्याऐवजी ते सतत मोठे झाले हा त्याच बोगस कामाचा प्रत्यय म्हणावा लागेल असे असूनसुद्धा यावर ना नगरपरिषद काही भूमिका घेत आहे ना कुणी विरोधक यावर काही बोलत आहेत त्यामुळे श्रीगोंदा नगरपरिषदेचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशीच झाली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही

त्यामुळे आतातरी नगरपरिषदेने या निकृष्ट पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याचे टेंडर रद्द करण्याची मागणी नागरिक करत आहेत तसेच जे निकृष्ट काम झालंय त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे
तरी 'त्या' ठेकेदारावर नगरपरिषद मेहेरबान का?पालिकेचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि... तरी 'त्या' ठेकेदारावर नगरपरिषद मेहेरबान का?पालिकेचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि... Reviewed by Prashasak on जून २१, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.