प्रशासक न्यूज,दि.२१जून२०२५
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या गलथान कारभारात काही केल्या सुधारणा होताना दिसत नाही मागील आठ ते दहा दिवसांपासून शहरातील शिवाजीनगर,परीट गल्ली,सुतार गल्ली,यासह शहरातील विविध भागात नगरपरिषदेकडून पुरवल्या जाणाऱ्या घरातील नळाच्या पाण्यात डास,आळ्या,किडे राजरोसपणे येत आहेत तसेच अतिशय हिरव्या रंगाचे प्रदूषित खराब पाण्याचा नागरिकांना पुरवठा केला जात आहे यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे
घरगुती वापरासह नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरतात पण आता त्या पाण्यातच अश्या प्रकारे किडे डास येत असतील तर नागरिकांनी नेमक काय करावं असा सवाल शहरवासियांना पडला आहे दूषित पाण्यासह डास मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याबाबत काही जागरूक नागरिकांनी याबाबत श्रीगोंदा नगरपरिषदेकडे तक्रार केली होती परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही तक्रार करून देखील आज परीट गल्ली येथे नगरपरिषदेच्या पाण्यात डास,डासाचे क्लचर आढळून आले याच भागात दोन दिवसांपूर्वी नळाच्या पाण्यात आळ्या आढळून आल्या होत्या
अश्या प्रकारे श्रीगोंदा नगरपालिका अस्वच्छ पाण्याचा पुरवठा करून शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे
तक्रार करून देखील स्वच्छ पाणी पुरवले जात नसल्यामुळे संतापलेल्या परीट गल्लीतील नागरिकांनी आज थेट नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागा विरोधातच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर नागरिकांचा संताप लक्षात घेऊन दोन दिवसात अस्वच्छ पाणीपुरवठा का होतोय कुठे प्रॉब्लेम आहे ते शोधून स्वच्छ पाणी पुरवठा करू असे नगरपरिषदेकडून सांगण्यात आल्यामुळे नागरिकांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मागे घेतला
परंतु अश्या प्रकारे होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आपली जबाबदारी झटकत असल्याचे सांगत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
पाण्यातूनच साथीचे आजार झपाट्याने फैलावतात त्यातच आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तशातच अश्या प्रकारे गढूळ आणि कीटक मिश्रित पाणी पुरवले जात असल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे नेमकी श्रीगोंदा पालिकेला आता कधी जाग येते आणि कधी स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो याकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष लागले आहे
कामकाजात सुधारणा नाहीच... शहरवासीयांच्या जीवाशी खेळ!
Reviewed by Prashasak
on
जून २१, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: