प्रशासक न्यूज,दि.२०फेब्रुवारी२०२५
श्रीगोंदा शहरातील जि.प.प्रा.नारायण आश्रम शाळा यांच्या वतीने मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुण विकसित व्हावेत,म्हणून पहिल्यांदाच जल्लोष चिमुकल्यांचा आविष्कार कलागुणांचा या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते
या बाल चिमुकल्यांचा मेळ्यात पालकांसह, परिसरातील नागरिकांनी ही रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा घेत आनंद घेतला.
देवा श्री गणेशा या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली, दैवत छत्रपती, वेसवची पारू, पाटलांचा बैलगाडा, फुले सावित्री नसती तर, चला जेजुरीला जाऊ, मंगळागौर, नऊवारी पाहिजे, फुलपाखरू, माऊली माऊली, मथुरेच्या बाजारी, नवरा पाहिजे गोरा गोरा, आयगो बाई लग्नाची घाई, रिमिक्स, मुळीच नव्हतं रे कान्हा ,आम्ही शेतकरी सह मराठी गाण्यांवर या लहान मुलांनी चांगलाच ठेका धरला,तर दैवत छत्रपती, चिपी चिपी चप्पा चप्पा, या गाण्यानं वर बालवाडीच्या चिमुकल्यानी ताल धरला. "स्वच्छ भारत" सारख्या नाटकातून समाज प्रबोधन करत सर्वांना संदेश ही दिला यावेळी दिला गेला
या कार्यक्रमासाठी,नगरसेविका सीमाताई गोरे,नगरसेवक शहाजीभाऊ खेतमाळीस,शाळा व्यवस्थापन समितीच्या सोनालीताई गोरे, केंद्रप्रमुख रमेश पाटोळे,श्रीगोंदा शाळेचे केंद्र प्रमुख आढाव सर, विशाल सकट,आप्पा सोनवणे या मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमास गोरे परिवाराचे विशेष व मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कापसे वस्ती शाळेचे दादासाहेब कोल्हे सर, खेतमाळीस वस्ती शाळेचे शरद तरटे सर, दत्तवाडी शाळेचे सुनील वाकडे सर यांनी देखिल कार्यक्रमात विशेष सहभाग घेतला.
तसेच स्नेहसंमेलन कार्यक्रमात विशेष कामगिरी म्हणून शाळेतील मुख्याध्यापक सुभाष रसाळ सर, शिक्षिका साधना गोसावी, छाया उदमले, यांना पालकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांचा सामाजिक संदेश.....!
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १९, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १९, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: