नागवडे कुटुंबं दिलेला शब्द पाळणारे कुटूंब,विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मला एक संधी द्या!महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ नागवडे यांचा नागरिकांच्या भेटीगाठीवर जोर!
प्रशासक न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४
श्रीगोंदा (प्रतिनिधी):- श्रीगोंदा शहारा पासून भोळे वस्ती आणि परिसरातील वाडी,वस्ती जवळ असून देखील विकासापासून वंचित राहीला याला जबाबदार कोण हे सर्वांना माहीत आहे पण या पुढे विरोधकांच्या खोट्या आश्वासनांना भुलून पुन्हा निवडून देऊ नका यावेळी आपल्याला संधी द्या या भागातील विकासाचे प्रश्न तर सोडवूच पण येथील पाण्याचा मुख्य प्रश्न देखील निकालात काढू असे आश्वासन महाविकास आघाडी उमेदवार सौ अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंदा शहरातील भोळे वस्ती तसेच परिसरातील नागरिकांच्या भेटी प्रसंगी बोलताना दिले .
सौ.नागवडे म्हणाल्या या भागात रस्ता नाही,विजेचा प्रश्न आहे पाट पाणी प्रश्न आहे टेल मधील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही पण लोकप्रतिनिधी विकासाच्या कोटीच्या गप्पा मारतात हे चित्र बदलण्याची गरज आहे. श्रीगोंदा मतदार संघात सर्वत्रच अशी परिस्थिती असून विकास केवळ भाषणात आणि कागदावर राहिला आहे.शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देणे,रस्ते,वीज,शासकीय योजनांची अंमलबजावणी ही आमदाराची जबाबदारी पण गेल्या ४० वर्षात विरोधकांनी केवळ आश्वासने दिली प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणी मिळत नाही,रस्त्यांची दुरवस्था कायम आहे जिथे रस्ते झाले तिथे डांबराणे महिन्यातच खडी बाहेर टाकून गुणवत्ता दाखवली अशी टीका करून सौ.नागवडे म्हणाल्या अशा रस्त्यापेक्षा त्यांनी रस्ता केला नसता तर बरे झाले असते अशी येथून रहदारी करणाऱ्यांची प्रतिक्रिया आहे .
नागवडे कुटुंब दिलेला शब्द पाळतात गेल्या ५० वर्षात शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे पैसे दिले,कामगारांना पगार दिला,शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आता विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन देखील यावेळी सौ अनुराधा नागवडे यांनी उपस्थित नागरिकांना केले
यावेळी सुनंदा पाचपुते,नगरसेवक संतोष कोथिंबिरे,प्रशांत गोरे,राजू गोरे,सतिष मखरे,शिवाजी शेळके,यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागवडे कुटुंबं दिलेला शब्द पाळणारे कुटूंब,विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मला एक संधी द्या!महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ नागवडे यांचा नागरिकांच्या भेटीगाठीवर जोर!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: